पंचायत समिती सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात #gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पंचायत समिती सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात #gondpipari

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :गोंडपिपरी - 

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर पंचायत समिती सभापतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेली गोंडपिपरी पंचायत समिती सर्वसाधारण महिलां प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सहा सदस्य असलेल्या पंचायत समितीत तीन पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे तिन्ही महिलांनी सभापती पदाकरिता वरिष्ठाकडे फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे नेमके कुणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यात १ जानेवारीला पंचायत समिती सभापती तर ४ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष निवड ला जाणार आहे. गोंडपिपरी पंचायत समिती चे सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे यापूर्वी अडीज वर्ष पुरुषांकडे असलेली पंचायत समिती पुढील कर्यकळकरिता महिलांवर्गाकडे जाणार आहे.

गोंडपिपरी पंचायत समितीत तीन विद्यमान महिला सदस्यांचा समावेश आहे. यात विठ्ठलवा डा पं. स.क्षेत्रातून कुसुम ढूमणे, करंजी येथून भूमी पीपरे तर भांगरम तलोधी क्षेत्रातील सुनीता येगगेवार यांचा समावेश आहे. या तिघांपैकी कुणीतरी एक महिला सभापती होणार हे निश्चित आहे. मात्र तीनही सदस्यांकडून सभापती पदासाठी जोरदार प्रयत्न चालवत जात असल्याची माहिती आहे. 

कुसुम ढुमने ह्या गोंडपिपरी येथील भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष नितीन ढुमने यांच्या मातोश्री आहेत. स्वभावाने शांत व संयमी म्हणून त्यांची या क्षेत्रात ओळख आहे. मागील लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा जरी पराभव झाला असला तरी विठ्ठलवाडा प.स.क्षेत्रात हंसराज भैया अहिर यांना भरघोस मताधिक्य मिळवून देण्यात कुसुम ढूमणे यांचा फार मोलाचा सहयोग राहिला आहे. त्यामुळे वरिष्ठ आणि पक्ष आपल्यालाच संधी देतील. अशी आशा कुसुम बाळगून आहेत. 

तर दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले बळवंत पिपरे यांच्या सून बाई भूमि पीपरे ह्या सुद्धा सभापती पदाच्या शर्यतीत आहेत. अनेक वर्ष पक्षाला दिलेल्या सेवेचा आपल्याला फायदा होईल. अशी आशा पीपरे हा बाळगून आहेत. तर हे संधी आपल्याला मिळेल असा आशावाद भंगाराम तळोधी येथील सदस्य सुनीता येगेवार ह्या ठेवून आहेत. 

सध्याचे विद्यमान सभापती दीपक सातपुते यांचा कार्यकाळ लवकरच संपत असून सातपुते यांच्यानंतर पंचायत समितीची धुरा तीन पैकी कोणत्या महिलेकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा माजी आमदार एड.संजय धोटे यांनी गोंडपिपरी शहरात पक्षाच्या बैठका व कार्यकर्त्यांशी भेटीगाठी करीत राजकीय गोड संबंध राखून ठेवण्यात यश मिळवले आहे. 

तीनही महिला सदस्यांना आपल्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडेल असा विश्वास आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व तसेच एड. संजय धोटे कुणाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.