खबरकट्टा / चंद्रपूर :
पद्मशाली फाउंडेशन द्वारा विदर्भ स्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा तीन गटांत आयोजित करण्यात आली होती.विदर्भातील विविध व अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर जवळपास ९००० विद्यार्थी या परीक्षेला सहभागी झाले होते.अत्यंत शांततामय वातावरणात व पारदर्शकपणे परीक्षा संपन्न झाली.
ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र निश्र्चित केले होते तेथील प्राचार्य, मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व सहाय्यक शिक्षकांनी निस्वार्थभावनेने या परीक्षेला सहकार्य केले.या परीक्षेच्या पेपरचे मूल्यमापन नागपूर येथे करण्यात आले.
'अ'गट खुला पदवी व त्यानंतरचे शिक्षण असणा-यांनी सहभाग घेतला.या अ गटात धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरचा विद्यार्थी मोहित रामचंद्र पाटील हा अव्वल ठरला असून प्रथम पुरस्कार रुपये १११११/- चा मानकरी ठरला आहे.द्वितीय पुरस्काराचा मानकरी ७७७७/₹ अहेरी येथील राजकिरण गूरनुले व प्रोत्साहनपर पुरस्काराचे मानकरी ११११/₹ सागर गाऊत्रे,शिलवंत यशवंत रामटेके मूल,महेश भानुदास गोहणे ठरले आहेत.
'ब'गटात जनता कनिष्ठ महाविद्यालय नागभीड चा जय कुर्झेकर व हिंदु ज्ञान मंदिर ब्रम्हपूरी चा हिमांशू विनोद महाले यांना समान गूण प्राप्त झाल्याने बक्षीस वितरणाचे दिवशी त्यांचे समक्ष ईश्वरचिठ्ठीने प्रथम व द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरविण्यात येईल असे संस्थेच्या सभेत ठरले.प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी तौष्णी राजीव केने जनता कनिष्ठ महाविद्यालय नागभीड,फरहीन जमील शेख,व मृणाल रमेश सोमनकर जा.कृ.बोमनवार महाविद्यालय चामोर्शी हे विजेते झालेली आहे.
क'गटात गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील कु.प्रथम अदिती अनिश बंडावार तर बासवी राजु नार्लावार ब्रम्हपुरी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी समृध्दी शिलवंत रामटेके मूल, समृध्दी बोगावार पांढरकवडा,कल्यानी समर्थ नागभीड,तनुश्री जाधव पांढरकवडा हे विजेते ठरले आहे.
'अ' गट खुला (१२वी नंतरचे) 'ब'-गट (वर्ग ९ते १२साठी) आणि 'क'गट (वर्ग ५ते ८साठी)अशा तीन गटांत परीक्षा घेण्यात आली.या करिता तीनही गटांना प्रत्येकी प्रथम पुरस्कार १११११/₹, द्वितीय पुरस्कार ७७७७/₹,प्रोत्साहन पर ११११/₹ चे तीन पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे पद्मशाली फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, बक्षिसांची एकुण रक्कम रुपये ६६६६३ लवकरच बक्षीस वितरणाचे दिवशी मान्यवरांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात येईल.बक्षीस वितरण कार्यक्रमाची तारीख निमंत्रणपत्रिका किंवा फोनद्वारे संबंधितांना कळविण्यात येणार आहे. सदर परीक्षा यशस्वीतेसाठी अध्यक्ष-सुरज रामदास बोम्मावार, उपाध्यक्ष-लोकेश बाबुराव परसावार, सचिव-किशोर रामचंद्र आनंदवार, कोषाध्यक्ष-संतोष नरहरी गोटमुकूलवार,सहसचिव-साई अल्लेवार परीक्षा संयोजक-आंनद आकनूरवार व सर्व संचालक पद्मशाली फाउंडेशन यांनी अथक परिश्रम केले.
सर्व विजेत्यांचे टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन !!
सर्व विजेत्यांचे टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन !!