गडचांदुर निवडणूक विशेष: तीन अपक्षांनी फोडलाय राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांना घाम...#gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदुर निवडणूक विशेष: तीन अपक्षांनी फोडलाय राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांना घाम...#gadchandur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर (गोमती पाचभाई )
गडचांदुर नगरपरिषद निवडणूक विशेष भाग -1


गडचांदूर नगरपरिषदेची निवडणूक येत्या 9 जानेवारी 2020ला होणार असून सर्व राष्ट्रीय, प्रादेशिक पक्ष अपक्ष उमेदवारांची मोर्चेबांधणी झाली असून आता मतदारांच्या गणिताची जुळवाजुळव सुरु झाली आहे.नगराध्यक्ष पद महिला (अनुसूचित जमाती )करिता राखीव असून शहरातील आठ प्रभागातून 17 नगरसेवक निवडून दिल्या जाणार आहेत.  

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  आघाडीने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले असून   प्रादेशिक पक्षांत  शिवसेना + शेतकरी संघटना + गोंडवाना + मराठा सेवा संघ यांनी एकी करीत चतुःसूत्री उमेदवार दिले आहेत. त्याव्यतिरिकही काही शहरातील मात्तबर मंडळी पक्षाने तिकीट नाकारल्याने बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून मतदारांच्या समोर जात आहेत.

पूर्वाश्रमीचे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले व गडचांदुर ग्रामपंचायत असताना सरपंच राहिलेले चरणदास मेश्राम यांना काँग्रेस पक्षाने नगरपरिषद निवडणुकीत तिकीट न दिल्याने अपक्ष म्हणून उमेदवार झाले आहेत. दरम्यान, त्यांना माननारा मोठा वर्ग असून या उमेदवारीने काँग्रेस पक्षातील मतांचे विभाजन होणार असल्याने एका प्रभागात त्याचा फ़टका बसणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


गेल्या कित्येक वर्षापासुन भाजपा पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करणारे व शहरातील युवकांची साथ लाभलेले सचिन गुरनुले यांना ऐनवेळी तिकीट न दिल्याने युवा वर्गात नाराजी पसरली आहे. त्यांच्या प्रभागात सचिन गुरनुले यांच्या अपक्ष उमेदवारीने सध्याच्या भाजपा उमेदवाराला पराभवाचा सामना देखील करावा लागू शकतो.

तर, शेतकरी संघटनेतील माजी पंचायत समिती सदस्य यादवराव चटप यांच्या परिवाराशी संबंधित व शिवेसेनेचे नेते सचिन भोयर यांचे नातेवाईक असलेले शैलेश विरूटकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने शेतकरी संघटना, शिवेसना समर्थित नगरविकास आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वाचा  31 डिसेंबर 2019 ला : गडचांदुर निवडणूक विशेष (भाग -2) फक्त खबरकट्टा वर....  "नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी फाईट...! "
दरम्यान, निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी पक्षप्रवेश घेणाऱ्या लोकांना भाजपाने दिलेले प्राधान्य, शिवेसना व शेतकरी संघटनेतील अंतर्गत गटबाजी आणि काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडीत केलेल्या घोडचुका यामुळे सध्या काही अपक्ष उमेदवारांना मतदार साथ देत आहेत. परंतु, हे उमेदवार केवळ मत विभाजन करतील क़ी विजय खेचुन आणतील हे बघणे महत्वाचे ठरेल.