राजुरा तालुक्यातील मुर्ती गावात वन विभागाच्या वतीने वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या श्रीहरी साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांना १५ लाख रुपये मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, श्रीहरी साळवे राहणार मूर्ती हे मागील महिन्यात २५/११/२०१९ ला वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाले होते. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य पत्नी पंचकुला साळवे व मुलगा मयूर साळवे यांचे नावे प्रत्येकी ५ लाख रुपये असे १० लाखाचे धनादेश राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच ५ लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित पाहुणे उपविभागीय अधिकारी वन विभाग अमोल गर्कल, पंचायत समिती सदस्य तुकाराम माणुसमरे ,गावातील सरपंच जयश्री बोडे ,उपसरपंच, किसन मुसळे, विहिरगाव येथील उपसरपंच इर्शाद शेख, विकास देवाळकर, बाबा डाखरे, मधुकर रामटेके, दादाजी साळवे, मधुकर अलोने, महादेव कोडापे, एकनाथ डाखरे यासह अनेक गावकरी उपस्थित होते.