हॉटेलच्या बोर्डाने घेतला एकाचा जीव, गुन्हा दाखल #flex - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हॉटेलच्या बोर्डाने घेतला एकाचा जीव, गुन्हा दाखल #flex

Share This
खबरकट्टा / आर्णी ( यवतमाळ ): 

हॉटेलवर बांधलेला लोखंडी नाम फलक पादचार्‍याच्या डोक्यावर पडल्याने निष्पाप जीव गेल्याची घटना उत्तम टॉकीज रोडवर शनिवारी दुपारी घडली. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवार डायनिंग हॉल उत्तम टॉकीज रोडवर असलेल्या या हॉटेल चा बोर्ड, समोरील रोडवरील सायकल ने जाणार्‍या सुदाम भिकू राठोड ( ५५ ) याच्या डोक्यावर पडल्याने तो जागीच गतप्राण झाला. सुदाम हा बुलढाणा अर्बन बँकेच्या गोडाऊनवर चौकीदारीचे काम करत होता. दुपारी एक वाजताचे दरम्यान कामासाठी सायकलने उत्तम टॉकीज रोडने जात असतांना, अचानक सदर हॉटेलवर निष्काळजीपणे बांधलेला लोखंडी बोर्ड डोक्यावर पडल्याने त्याचा जीव गेला. 

सुदामची पत्नी माला सुदाम राठोड यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला . चौकशीत आणखी काय निष्पन्न होते , त्यानुसार कार्यवाही केली जाईल,असे ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी सांगितले.