खबरकट्टा / चंद्रपूर : सावली -
सावली तालुक्यातील बोथली येथील शेतकरी प्रदीप पुंडलिक गड्डमवार यांचा शेतातील ८ एकर शेतातील धान च्या पुंजण्याला दिनांक २२ च्या रात्रौ ला अज्ञात आरोपीने आग लावल्याची घटना पहाट उघडकीस आली.
आग एवढी मोठी होती की ते आटोक्यात न आल्याने ४ लाख रुपयांचे उत्पन्न भस्म झाल्याचा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी सावली पोलिसात तक्रार देण्यात आली असून सावली तालुक्यात अश्या आगी लावण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकर्यांत भीती चे वातावरण पसरले आहे. शेतकरी प्रदीप गडडमवार हे परिवार सह शिर्डी येथे गेलेले होते. त्यांचा आठ एकर शेतातील श्रीराम या धान चे पिकाचे पुंजने शेतात जमा करण्यात आले होते.
मात्र रात्रौ च्या सुमारास अज्ञात आरोपी ने धान पिकाला आग लावून पसार झाले. आग रौद्र रूप धारण केल्यावर पहाटे फिरायला जाणार्या काही जणांना आगी चे चित्र दिसले त्यावरून त्यांनी प्रदीप गडडमवार यांचा घरी गेले. मात्र ते गावाला गेल्यामुळे गावातीलच त्यांचे भाऊ प्रकाश गडडमवार यांना माहिती दिली. त्यावरून ते घटना स्थळी पाहणी करून पोलीस व तहसीलदार यांना माहिती दिली. आग भयंकर असल्याने पूर्ण पीक जाळून खाक झाले.
आज दिनांक दुपारी २३ डिसेंबर ला दुपारी तीन च्या सुमारास शेतकरी प्रदीप गडडमवार यांनी पोलिसात तक्रार देऊन या प्रकरणाचा तपास करावा व आरोपींना अटक करावी अशी मागणी केली. तर या वारंवार घडणार्या घटनेकडे शासन व पोलीस प्रशासन यांनी लक्ष देऊन आरोपीना अटक करावे व नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी माजी सरपंच प्रकाश गडडमवार यांनी केली आहे.
हेही वाचा भाजप आणि मुनगंटिवार सत्तेवरून गेले; इकडे चंद्रपुरात मद्यशौकिनांच्या आशा पल्लवित : वाचा - राज्यातील सत्ताबदलाचा असाही परिणाम !
" माणुसकीची भिंत " चंद्रपूर मनपाचा विधायकी उपक्रम !
हेही वाचा भाजप आणि मुनगंटिवार सत्तेवरून गेले; इकडे चंद्रपुरात मद्यशौकिनांच्या आशा पल्लवित : वाचा - राज्यातील सत्ताबदलाचा असाही परिणाम !
" माणुसकीची भिंत " चंद्रपूर मनपाचा विधायकी उपक्रम !