हजारो शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित #farmers-deprived-of-pm-kisan-sanman-scheme - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हजारो शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित #farmers-deprived-of-pm-kisan-sanman-scheme

Share This
-भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक.

खबरकट्टा / चंद्रपूर : 
            
कोरपना तालुक्यातील हजारो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित आहेत.सदर योजनेची मदत शेतकऱ्यांना मिळण्याकरीता भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यलय येथे धडक देऊन नायब तहसिलदार यांना याबाबतचे निवेदन दिले.

          
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने १ डिसेंबर २०१८ पासून राज्यात अंमलात आणली,तसेच दर ४ महिन्यानी २ हजार रुपये प्रमाणाने तीन हप्त्यात एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांनाच्या खात्यात टाकायचे होते,परंतु कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एक वर्ष होऊन सुद्धा एकही हप्ता सदर योजनेचा जमा झालेला नाही.


यासंदर्भात तहसील कार्यालय येथे वारंवार विचारणा केली असता काही तांत्रिक अडचणीमुळे सदर योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे सांगितले जात होते,परंतु सदर तांत्रिक अडचण दूर होत नव्हती,त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी सदर योजनेचा लाभापासून वंचित होते,सदर बाब भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रकरणाची दखल घेऊन याबाबत नायब तहसिलदार यांना निवेदन दिले.

तसेच येत्या काही दिवसात सदर तांत्रिक अडचणी दूर करून योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल व ज्या शेतकऱ्यांना आधार कार्ड किंवा खाते क्रमांक मध्ये काही त्रुटी असतील तर त्यांनी सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालय येथे संपर्क साधून त्रुटी दूर करावे असे नायब तहसिलदार श्री. विनय कौलवकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले.यावेळी  निवेदन देताना कोरपना तालुक्यातील विविध गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.