जातीयतेतून मारहाण व शाळेतून मुलांना हाकलले : महिनाभरापासून वंचित कुटुंब तीन मुलांना घेऊन फिरतंय वणवण : जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल #Ethnicity - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जातीयतेतून मारहाण व शाळेतून मुलांना हाकलले : महिनाभरापासून वंचित कुटुंब तीन मुलांना घेऊन फिरतंय वणवण : जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल #Ethnicity

Share This

देशाने परग्रहावर पोहोचण्याइतपत प्रगती केली आहे,  स्वातंत्र्यानंतर  जातीय वैविध्यतानां संविधानाने जरी अस्पृश्यतेची वाद पुसण्याचा अधिकार दिला असला आणि वाढत्या साक्षरतेच्या प्रमाणाने जातीयवाद मोडून काढण्याचे शिक्षण दिल्या जात असले तरीही भारताच्या मानसिकतेतून अजूनही भेदभाव काही केल्या पुसल्या जात नाही. तर पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही कुठे ना कुठे हा छळ सुरूच आहे.असेच एक उदाहरणं समोर चंद्रपूर जिल्ह्यात समोर आले आहे.
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी - 

आपल्या मुलाला घेऊन जिल्हा परिषद शाळेत गेलेल्या आई वडीलांना मुख्यधापका समोरच जातीवाचक शिविगाड करित लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकाराने धास्तावलेल्या त्या कुटूंबाने गावातून पलायन केले.मागिल महीणाभरापासून वेगवेगळ्या गावातील नातेवाईकांचा घरी आसरा घेत ते कुटूंब फिरत आहे. त्यांचा तिन चिमुकल्या मुलांची महीणाभरापासून शाळा बुडाली आहे.जातीयतेतून हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप कुटूंबाने केला आहे. 

हा धक्कादायक प्रकार गोंडपिपरी तालूक्यातील धामणगाव येथे घडला आहे.शालिक पाडुंरंग बोणगीरवार असे फिर्यादी चे  नाव आहे. या प्रकाराची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.

गोंडपिपरी तालूक्यातील धामणगाव येथिल शालिक पांडुरंग बोनगीरवार यांना भाग्यश्री,आयशा,गौरव असे अपत्य आहेत.भाग्यश्री पाचव्या वर्गात,आयशा चौथ्या तर गौरव पहील्या वर्गात शिक्षण घेत आहे. हे तिघेही धामणगाव येथिल जिल्हा परिषदेचा शाळेत शिक्षण घेत आहेत.

सविधान दिनी शाळेतून घरी आल्यावर तिन्ही मुलांनी सरांनी टिसी(शाळा सोडल्याचा दाखला ) घेऊन जाण्यासाठी तूम्हाला बोलाविल्याचे वडीलांना सांगितले . असे काय घडले कि माझ्या तिन्ही मुलांना शाळेतून काढल्या जात आहे,या विचाराने वडील शालिक आई पुष्पा चिंताग्रस्त झाले दूसर्या दिवशी आई,वडील मुलगा गौरव यांनी शाळा गाठली.कार्यालयात मुख्यधापक गंधेवार,तमुस अध्यक्ष निलकंठ पुलगमकार,आणि इतरही दहा व्यक्ती होते.निलकंठ पुलगमकार यांनी शाळेत येण्याचे कारण विचारले. सरांनी मुलांचा टिसी नेण्यासाठी बोलाविले असे शालिक बोनगिरवार यांनी सांगितले.

तितक्यात कार्यालयात बसलेले संजय झाडे, भगिरथ खेडेकर आणि दहा बारा जणांनी कोणतेही कारण नसताना जातीवाचक शिवीगाड करित लाथा बुक्यांनी मारहाण  केली.कार्यालयात बसून असलेल्या विकास धानोरकर,गुरुदास झाडे या दोघांनी पुष्पा बोनगीरवार यांना ओढताण करित साडीचा पदर ओढल्याचे  तक्रारित म्हटले.

तर पोलीस पाटील वसंता झाडे यांनी जातीवाचक शिवीगाड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराने धास्तावलेल्या बोणगीरवार कुटुंबाने गाव सोडले.जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दिली. 

या घटनेला एक महिना लोटून गेलाय मात्र गावात गेलो तर लोक मारतील या भितीने बोनगीरवार कुटूंब वेगवेगळ्या गावात असलेल्या नातेवाईंकाकडे आसरा घेत आहेत.तिन्ही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले असून एकंदरीत या गरीब कुटुंबाचा कोणालाही त्रास नसताना फक्त जातीयवाद हे कारण पुढे येत आहे.  दरम्यान गोंडपिपरी पोलीस स्टेशनला या घटनेची तक्रार नोंदविली असून उप विभागीय अधिकारी मुल या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.