डॉ आकाश जिवने याच्या विरुद्ध नाभिक समाज रस्त्यावर : वैद्यकीय परवाना रद्द करून कठोर कारवाही करण्याची मागणी #doctor - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डॉ आकाश जिवने याच्या विरुद्ध नाभिक समाज रस्त्यावर : वैद्यकीय परवाना रद्द करून कठोर कारवाही करण्याची मागणी #doctor

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना : 


नारंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जिवणे यांनी त्यांच्या खाजगी रूग्णालयात काम करणारी तरूणीवर अत्याचार केल्याची घटना गुरूवारी पोलीस तक्रारीतून उघडकीस आली.कोरपना तालुक्यातील नाभिक समाजातील तरुणीवर डॉ. आकाश जीवने यांनी घृणास्पद कृत्य केले. त्या विरोधात आज कोरपना, गडचांदूर, नांदा फाटा येथे बंद पाडून या घटनेचा जाहीर निषेध करत त्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन आज  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन कोरपना यांना देण्यात आले.


डॉ आकाश जिवने यांनी केलेल्या अत्याचार विरोधात महाराष्ट्र नाभिक महामंडळाने कोरपना कोरपना, गडचांदूर, नांदा फाटा येथे  रस्त्यावर उतरून जाहीर निषेध व्यक्त करत घृणास्पद कृत्य करून मुलीचा व कुटुंबीयांचा छळ केल्यामुळे, वैद्यकीय परवाना रद्द करून फाशीच्या शिक्षेची मागणी ठाणेदार कोरपना यांना निवेदन देऊन करण्यात आली. 


प्रकरणात फियार्दीत तरूणी ही वैद्यकीय अधिकार्‍याच्या निवासस्थानी राहत असताना अंघोळ करीत असतांना गुप्तपणे तीच्या नकळत नग्न अवस्थेत फोटो काढले ते फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने अनेकदा शारिरीक संबंध प्रस्तापित केले. याच दरम्यान फिर्यादी तरूणीचे लग्न जुडले असतांना आरोपीने तिच्या भावी नवर्‍याला तिचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवर पाठवून तिचे लग्न मोडण्यात आले. तरूणीच्या तक्रारीवरून वैद्यकीय अधिकार्‍यावर अपराध क्रं. ३३१/१९ कलम ३७६ (२) (एन) सह कलम ६७ आय.टी. अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


या बलात्कारी नराधमाचा वैद्यकीय परवाना रद्द करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ (समस्त नाभिक समाज) चंद्रपूर  यांच्यातर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर घटनेतील आरोपी डॉ आकाश जिवने  याला काल रात्री कोरपना पोलिसांनी अटक केली असून  असून पुढील तपास कोरपण्याचे ठाणेदार अगुरनुले यांचे मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.  


कोरपना परीसरात उच्च शिक्षीत व्यक्तीकडून व पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीकडून हा प्रकार घडल्याने तालुक्यात असंतोष पसरला आहे.