-गावा-गावात उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करणार असे आश्वासन विलास मोहिणकर सामाजिक कार्यकर्ते यांनी दिले.
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - प्रतिनिधी (जावेद पठाण )
नेरी येथून जवळ असलेल्या सिरपूर येथे भोई ढिवर केवट समाजाचा उपवर वधू परिचय व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या आवारात करण्यात आले आहे सिरपूर येथे प्रथमच या समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे समाजातील तरुण- तरूणींना एकत्र येऊन समाजातील सर्व लोकांना एकत्रीत करून समाज प्रबोधन व सामाजिक समस्या वर प्रकाश टाकून त्यावर मार्ग काढण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.
या मेळाव्यात येणारे उद्धघाटक म्हणून संघर्ष वाहिनीचे संयोजक दीनानाथ वाघमारे अध्यक्षस्थानीं कृष्णाजी नागपुरे प्रमूख मार्गदर्शन सुरेश शिवरकर व गजेंद्र चाचरकर,यशवंत दिघोरे राजू डहारे प्रकाश नान्हे,आदीची उपस्थिती राहणार आहे प्रमूख अतिथी म्हणून प्रकाश डहारे, प्रा राजेश डहारे,मनोहर गेडाम,डॉ दिलीप शिवरकर, विलास मोहिणकर,अमोल दिघोरे, देविदास नगरे,नारायण पचारे,पुडंलिक मांढरे,शैलेश वागधरे,प्रकाश पचारे,गुलाब भानारकर, वासुदेव दिघोरे, आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते.