विहिरींची कामे आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील लोकांना मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान #chimur #panchaytsamiti - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विहिरींची कामे आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील लोकांना मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान #chimur #panchaytsamiti

Share This
-चिमूर पंचायत समिती मधील उपसभापती  श्री शांताराम सेलवटकर   यांची शेतकऱ्यांना विनंती
-आपली कामे आपली माणसे : त्यामुळे आपल्या तालुक्यातील रोजगारीचा प्रश्न निर्माण होणार नाही

खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )

चिमूर पंचायत समिती मध्ये सण २०१५ - १६ ला धडक विहिरींची कामे झाली होती चिमूर परिसरातील शेतकऱ्यांनी काही कामे बाहेर गावातील ठेकेदाराला दिलेली होती ते कामे पूर्ण झालेली नव्हती त्या कामाच्या सर्वात जास्त तक्रारी झाल्या होत्या बाहेर गावातील ठेकेदार काम पूर्ण न करून  काही अधिकाऱ्यांशी सगमत करून शेतकऱ्यांच्या खात्यात असलेली रकम अरेदावी-दादागिरी कडून काढतात. 

मग आपण शेतकरी आमच्या कडे त्याची तक्रारी  नोंदवतात. ठेकेदार बाहेर गाव चे असल्यामुळे  ते आम्हालाच उद्धट भाषेत संभाषण करतात आपणास सर्व शेतकरी बांधवाना नम्र विनंती आहे की कोणत्याची आमिषला बळीन पडता आपल्या विहिरींची कामे आपण आपल्या गावातील आपल्या परिसरातील लोकांना दिली तर तो त्या पेक्षा जास्त व त्यापेक्षा चांगली कामे करेन.
आपल्या चिमूर परिसरात काही   बाहेर गावाचे ठेकेदार कामा साठी फिरत आहेत आणी शेतकऱ्यांना आमिष देत आहे मी तुम्हाला १००००/- ते ५००००/- हजार रुपये देऊ परन्तु शेतकरी बांधवांनो लक्षातघ्या तो ठेकेदार तुम्हाला तुमच्या कामातून तुम्हाला पैसे देईल मग तुमची  कामे कशी होतील या वर्षी मग तूम्ही शेतकरी पंचायत समिती मध्ये येऊन तक्रारी कराल यासाठी शेतकरी बांधवाना नम्र विनंती आहे.

 "आपला गाव आपली माणसे "हा उद्धेश समोर ठेवून आपली कामे आपल्या परिसरातील लोकांना ध्या त्यामुळे आपल्या परिसरातील लोकांना रोजगार मिळेल आणि आपल्या परीसरातील  जनतेचा रोजगार उपलब्ध होईल हीच परिसरातील शेतकरी बांधवा कडून अपेक्षा आहे