अस्थिविसर्जनास जाणाऱ्या स्कूल बस ला अपघात : दोन व्यक्ती सहित एक रेडा ठार #schoolbus #roadaccident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अस्थिविसर्जनास जाणाऱ्या स्कूल बस ला अपघात : दोन व्यक्ती सहित एक रेडा ठार #schoolbus #roadaccident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

मुल-जानाळा रोडवर झालेल्या भिषण अपघातात 2 ठार तर 2 गंभीर जखमी -चंद्रपुर जिल्हयातील मुल शहरापासुन 4 किलोमीटर अंतररावर बस-दोन दुचाकी आणि टाटा पिकअपचा भिषण अपघात झाला यात 2 बाईकस्वार जागीच ठार आणि एक म्हैस जागीच ठार झाली तर 7 जख्मी झाले असुन यात 2 गंभीर जख्मी आहे त्यांना चंद्रपुर येथील जिल्हा रूग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे. 


सदर बस ही भद्रावतीच्या बालाजी  ट्राव्हलस ची असुन या बस वर नारायण विद्यालय चंद्रपुर  असे  नाव लिहिलेले आहे.
आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुल-चंद्रपुर रोडवर डोनी फाटयाजवळ असलेल्या वळणावर भद्रावती वरून मार्खंडा येथे अस्थी विसर्जणाकरीता खासगी बस क्रमांक एमएच 34-ए- 8362 जात होते विरूध्द दिशेने होन्डा शाईन एमएच-34-एएक्स 9891 आणि बजाज प्लाटीना एमएच.34-यु-6826 हे आपसात टक्कर दिल्याने यांना वाचविण्याच्या प्रयत्ना बसच्या चालकाने टाटा पिकअप क्रमांक एमएच-34-बिजी-5004 ला धडक दिली यात एक म्हैस जागीच ठार झाली तर 2 म्हैस गंभीर जख्मी झाले आहे.तर होंडा शाईन ने जात असलेले लोहारा कॅम्प येथील रहिवासी प्रफुल प्रभार सलोटे आणि प्रितम सुरेश सेजोडे हे जागीच ठार झाले तर बजाज प्लाटीना ने जात असलेले सुशी दाबगांव येथील रहिवासी श्रीकांत सुखदेव राउत आणि निलेश लहानु मांडे हे गंभीर जख्मी झाले आहे तर बस मधील 5 प्रवाशांना किरकोळ मार लागला यात चालकाचाही समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपुत आपल्या पोलीस ताफयासह पोहचुन तात्काळ जख्मींना मुल येथील उपजिल्हा रूग्णालयत पोलीस वाहनाने पाठविले. गंभीर जख्मींना चंद्रपुर येथील जिल्हा रूग्णालयामध्ये पुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले असुन प्राथमीक तपास पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे करीत आहे.बस वेगात असल्याने समोरील टेम्पो आणि  बस मध्ये मोठी  धडक झाली व बसला ओवरटेक करत असलेल्या दुचाकी स्वार या अपघातात जागीच ठार झाले.

सुत्रांच्या नुसार भद्रावती वरून मारखंडा  अस्थी वीसर्जन करता ही स्कुल बस किरायने जात होती,शाळेच्या बस मध्ये विद्यार्थी नसुन प्रवासी कसे हा प्रश्न उदभवतोय---------------------------------------------------------------
स्कूल बस व टेम्पो चा भिषण अपघात दोन ठार 


खबरकट्टा / चंद्रपूर : मूल (01:05 PM) थोडक्यात -


मूल तालुक्यातील जानाळा मार्गावर आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास स्कूल बस व टेम्पो चा भिषण अपघात झाला असून यात  बाजूने जात असलेल्या दुचाकीस्वार दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून टेम्पो  मधील  रेड्याचाही मृत्यू झाला आहे.