कॅन्सरग्रस्त महिलेला ग्रामीण पत्रकार संघाकडून आर्थिक मदत, लोकप्रतिनिधी यांना मदतीचे आवाहन #cancer - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कॅन्सरग्रस्त महिलेला ग्रामीण पत्रकार संघाकडून आर्थिक मदत, लोकप्रतिनिधी यांना मदतीचे आवाहन #cancer

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर: गाडचांदूर- 

“मानव सेवा हिच ईश्वर सेवा” हा मूलमंत्र डोळ्यापुढे ठेवून कोरपना ता.ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने फुल नाही तर फुलाची पाकळी,म्हणुन एका कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत देण्यात आली.

कोरपना तालुक्यातील निमणी येथील सुनीता प्रकाश टेकाम असे कॅन्सरग्रस्त महिलेचे नाव असून हीला दोन लहान मुले व म्हातारी आई आहे.अठराविश्व दारिद्रयाचे जीवन जगत असलेल्या सदर महिलेला “एमिलोब्लास्टोमा” नामक कॅन्सर झाला आहे.हा आजार दिवसेंदिवस वाढत असून सेवाग्राम व इतर दवाखान्यात दाखविले असता लाखोंचा खर्च असल्याचे सांगण्यात आले.

कॅन्सर हा आजार शासनाच्या योजनेत बसत नसल्याने आर्थिक मदतीची आशाही मावळत चालली आहे.वैद्यकीय उपचारासाठी एवढी मोठी रक्कम नसल्याने कॅन्सर वाढतच चालला आहे.दिवसेंदिवस प्रकृतीत बिघाड होत असून सदर पीडित महिलाला लवकरात लवकर उपचाराची गरज आहे.मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या गरीब महिलेला कोणत्याही मार्गाने का होईना उपचारासाठी शासनाची मदत मिळवून द्यावी असे मत अनेकांनी व्यक्त केले असून गरजवंत,संकटग्रस्त,गोरगरीबांना मदत व न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या सदर पत्रकार संघाच्या समस्यांचे या कार्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.संघाचे अध्यक्ष दीपक खेकारे सह सैय्यद मूम्ताज़ अली,मयूर एकरे,गणेश लोंढे,हबिब शेख व निमणीचे उपसरपंच उमेश राजूरकर तसेच गावकऱ्यांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.


ग्रामीण पत्रकार संघ नेहमी समाजाशी जुडून असून समाजकार्य असो की आपल्या लेखणीतून अन्याय ग्रस्ताना न्याय मिळवून देण्यास तत्पर असतो. सुनीता ताईला ज्या माध्यमातून आर्थिक मदत देता येईल अशा दात्यांनी मदत करावी - दिपक खेकारे, अध्यक्ष कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघ