नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ उद्या राजुरा येथे "जन समर्थन रॅली" #caa - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ उद्या राजुरा येथे "जन समर्थन रॅली" #caa

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


नुकताच भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमताने पारित करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याने जनमानस ढवळून निघाले असुन वर्षानुवर्षे भारतात राहुन, येथिल कायद्याचे संपूर्णपणे पालन करून आपले उदरनिर्वाह करणारे मात्र तरीही दुर्दैवाने भारतीय नागरिक नसलेले मुळ पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान मधुन धार्मिक छळामुळे आपले घरदार, जमीनजुमला सोडुन निर्वासित जिवन जगत असुन अशा लोकांना नुकत्याच पारित झालेल्या कायद्याने मोठा दिलासा मिळाला असुन त्यांचा भारतीय नागरिक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

त्यामुळे भारत सरकारचे अभिनंदन आणि वर्षानुवर्षे निर्वासित जिवन जगत असलेल्या लोकांचे भारतीय नागरिक म्हणुन स्वागत करण्यासाठी तसेच ह्या सुधारणेमुळे मुस्लिम बांधवांच्या मनात राजकीय स्वार्थासाठी काही पक्षांनी निर्माण केलेला गैरसमज दुर करून त्यांचे भारताच्या मुख्य प्रवाहातील स्थान कायम असल्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय चेतना मंचाद्वारे राजुरा शहरात उद्या दिनांक 30 डिसेंबर रोजी भव्य रॅली तसेच मार्गदर्शनपर जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 


 ह्या कार्यक्रमासाठी माजी आमदार संजय धोटे , माजी आमदार सुदर्शन निमकर रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, राहुल सराफ, खुशाल बोंडे अरुण मस्की, नगरसेवक राधेश्याम अडाणीया,  उज्ज्वला जयपूरकर, सतिश धोटे, प्रशांत घरोटे, रूपेश भाकरे, राजु साईनवार, दिलीप वांढरे ईत्यादी उपस्थित राहणार असुन रॅली साठी जनतेने  सहकुटुंब उपस्थित रहावे  आवाहन राष्ट्रीय चेतना मंचच्या वतीने करण्यात आले आहे.