एन.आर.सी.व सी.ए.ए.कायदयाच्या विरोधात सर्व समाज घटकांतील नागरिकांचा "क्रांती भुमी चिमुर" शहरात शांततेत मोर्चा संपन्न #CAA #NRC - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एन.आर.सी.व सी.ए.ए.कायदयाच्या विरोधात सर्व समाज घटकांतील नागरिकांचा "क्रांती भुमी चिमुर" शहरात शांततेत मोर्चा संपन्न #CAA #NRC

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - प्रतिनिधी  चिमुर राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर कायदा व नागरिकता संशोधन कायदा. हा बहुसंख्य ओबीसी , एससी ,  एसटी , अल्पसंख्यांक , विमुक्त भटक्या जाती जमाती, मागासवर्गीय समाज घटकांतील नागरिकांवर अन्याय व अत्याचार करणारा NRC व CAA हा कायदा आहे.हा कायदा म्हणजे एक प्रकारची जुल्मी राजवटच,अशा या जुल्मी कायद्याचा विरोध करण्यासाठी, आज २६ डिसेंबरला,चिमूर येथे बहुसंख्य समाज घटकांतील नागरिकांतर्फे,मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. या मोर्चा मध्ये २००० लोकांची उपस्थिती होती. 

हा मोर्चा चिमूर शहरातील नेहरू कनिष्ठ महाविधालयाच्या प्रांगणातून काढण्यात आला.त्यानंतर संविधान म्हणून मोर्चाची सुरवात करण्यात आली.व ज्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला त्या मुख्य मार्गावरील डोंगरावर चौकातील शहीद बालाजी रायपूरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करण्यात आली.व त्यानंतर इंदिरा नगर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करण्यात आली तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माल्यार्पण अर्पण करण्यात आली. 

हुतात्मा स्मारक येथे माल्यार्पण अर्पण करून एन.आर.सी. तसेच सी.ए.ए. या कायदया विषयी माहिती मिरजा परवेज बेग राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी जनतेला पटवून दिली. व हा कायदा भारत देशातील मुळ रहिवासी बहुजन नागरिकांसाठी घातक असून, बहुजनांना घुसपेठी ठरवीणारा आहे.यामुळे या कायद्याचा विरोध करणे आवश्यक आहे.जुल्मी कायद्याचा विरोध करण्यासाठी, हा मोर्चा काढण्यात आला आहे.या मोर्च्यात दोन हजार च्या वर जनतेनी सहभाग नोंदविला व बहुजन समाजातील नागरिका तसेच महिलांनी सुद्धा मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. या मोर्चाची हुतात्मा स्मारक येथे सांगता करण्यात आली.नंतर तहसीलदार साहेब यांना NRC व CAA कायदा रद्द करण्यात यावा याबद्दल निवेदन देण्यात आले. व हा मोर्चा अतिशय शांततेत पार पडला असून याची संपूर्ण चिमूर शहरात चर्चा रंगली आहे. 

मोर्चाच्या वेळेस वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष धनराज मालके,समाज सेवक प्रदीप बंडे,दखल न्युज व दखल न्युज भारत चे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके, डॉ.रामेशकुमार गजभे , अरविंद संदेकर , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चिमुर तालुका संघटक विलास मोहिनकर,डॉ.महेश खानेकर,डॉ.रहेमान खान पठाण,डॉ.आशिष पाटील,दादाजी खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय संचालक एकनाथ गोंगले,हाजी.कलीम पठाण प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच सामाजिक कार्यकर्ता पप्पु शेख,बामसेफचे विकास अंबादे,नाशिर खान,मो.आरीफ शेख,अब्दुल कुद्दुश शेख,मोहम्मद फारुख,सामाजिक कार्यकर्ता महेश मळावी,सामाजिक कार्यकर्ता किशोर अंबादे,यांना समाज युवा संघटना पदाधिकारी प्रविण जिवतोडे,आसीफ पटेल,आरीफ उर्फ बबलू शेख टिपू सुलतान फाऊंडेशन,निलेश कोसे समता सैनिक दल, इक्बाल सौदागर,डॉ.नवाज शेख,कष्टकरी जन आंदोलन संयोजक सुरेश डांगे,बहुजन समाज पार्टी चिमुर विधानसभा अध्यक्ष सचिन लभाने,बहुजन समाज पार्टी चिमुर विधानसभा सचीव निलकंठ जांभूळे,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे,विभागीय अध्यक्ष,महा.तैलिक प्रांतिक महासभा चे श्रिहरी सातपुते हे सुद्धा उपस्थित होते.
तर सामाजिक कार्यकर्ता अविनाश अगडे,बि.आर.एस.पी.चे प्रकाश पाटील,आंबेडकरी संघर्ष पार्टीचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर अंबादे,अखील भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष श्रिदास राऊत,प्रमोद अंबादे,किशोर जांभुळकर,पिंटू उर्फ प्रविण गजभिये वंचित बहुजन आघाडी,सुनिल येसांबरे, आदिवासी माना जमात संघटनेचे पदाधिकारी रवी धारणे,सामाजिक कार्यकर्ता प्रदीप नंदरधने,दिनेश बांबोळे उपस्थित होते.