एन.आर.सी.व सी.ए.ए.कायद्या विरोधात २६ डिसेंबरला सर्व समाज घटकांतील नागरिकांचे "क्रांती भुमी" चिमुरात जनआंदोल : सर्व सामाजिक संस्था चा मोर्चात सहभाग #CAA #NRC - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एन.आर.सी.व सी.ए.ए.कायद्या विरोधात २६ डिसेंबरला सर्व समाज घटकांतील नागरिकांचे "क्रांती भुमी" चिमुरात जनआंदोल : सर्व सामाजिक संस्था चा मोर्चात सहभाग #CAA #NRC

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर - प्रतिनिधी (जावेद पठाण )

चिमुर राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर कायदा व नागरिकता संशोधन कायदा हा बहुसंख्य ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याक-विमुक्त भटक्या जाती जमाती, मागासवर्गीय, समाज घटकांतील नागरिकांवर अन्याय व अत्याचार करणारा आहे.हा कायदा म्हणजे एक प्रकारची जुल्मी राजवटच अशा या जुल्मी कायद्याचा विरोध करण्यासाठी २६ डिसेंबरला चिमूर येथे बहुसंख्य समाज घटकांतील नागरीकां तर्फे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.





एन.आर.सी.व सी.ए.ए.कायदा हा भारत देशातील मुळ रहिवासी बहुजन नागरिकांसाठी घातक असून, बहुजनांना घुसपेठी ठरवीणारा आहे.यामुळे या कायद्याचा विरोध करणे आवश्यक आहे.

जुल्मी कायद्याचा विरोध करण्यासाठी,२६ डिसेंबरला, म्हणजेच येत्या गुरुवारला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्च्यात हजारो च्या संखेनी, बहुजन समाजातील नागरिकांनी-आया बहिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन, आयोजकांनी केले आहे.

नेहरू विद्यालयाच्या जवळून मोर्चाला सुरुवात होणार आहे व तहसील कार्यालय चिमूर येथे मोर्च्याचे सभेत रूपांतर होणार आहे.मोर्चा अतिशय शांततेत पार पडला जाणार आहे.या मोर्चाच्या समारोपप्रसंगीअनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.


वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष धनराज मालके,समाज सेवक प्रदीप बंडे,दखल न्युज व दखल न्युज भारत चे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चिमुर तालुका संघटक विलास मोहिनकर, डॉ.महेश खानेकर डॉ.रहेमान खान पठाण,डॉ.आशिष पाटील,दादाजी खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय संचालक एकनाथ गोंगले हाजी.कलीम पठाण, सामाजिक कार्यकर्ता पप्पु शेख, बामसेफचे विकास अंबादे, नाशिर खान,मो.आरीफ शेख,अब्दुल कुद्दुश शेख,मोहम्मद फारुख,सामाजिक कार्यकर्ता महेश मळावी,सामाजिक कार्यकर्ता किशोर अंबादे,यांना समाज युवा संघटना पदाधिकारी प्रविण जिवतोडे,आसीफ पटेल,आरीफ उर्फ बबलू शेख टिपू सुलतान फाऊंडेशन,निलेश कोसे समता सैनिक दल, इक्बाल सौदागर,डॉ.नवाज शेख,कष्टकरी जन आंदोलन संयोजक सुरेश डांगे,बहुजन समाज पार्टी चिमुर विधानसभा अध्यक्ष सचिन लभाने,बहुजन समाज पार्टी चिमुर विधानसभा सचीव निलकंठ जांभूळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे विभागीय अध्यक्ष,महा.तैलिक प्रांतिक महासभा चे श्रिहरी सातपुते, सामाजिक कार्यकर्ता अविनाश अगडे,बि.आर.एस.पी.चे प्रकाश पाटील,आंबेडकरी संघर्ष पार्टीचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर अंबादे,अखील भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष श्रिदास राऊत,प्रमोद अंबादे,किशोर जांभुळकर,पिंटू उर्फ प्रविण गजभिये वंचित बहुजन आघाडी,सुनिल येसांबरे, आदिवासी माना जमात संघटनेचे पदाधिकारी रवी धारणे,सामाजिक कार्यकर्ता प्रदीप नंदरधने,दिनेश बांबोळे,हे मोर्चाचे आयोजक असून,मार्गदर्शक सुध्दा करणार आहे.