"रस्त्यावरची ती" आणि "माणसातला तो" : वाचा खबरकट्टा विशेष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"रस्त्यावरची ती" आणि "माणसातला तो" : वाचा खबरकट्टा विशेष

Share This
हे सुद्धा माणसं आहेत...यांचे जगणे सुद्धा मान्य करा ना! - हितेश दादा बनसोड (सावनेर,  जिल्हा नागपूर) यांच्या शब्दात वाचा खाली...... !!!! 


खबरकट्टा / यवतमाळ :वणी -


वणी- यवतमाळ जिल्ह्यातील ‘वणी बहुगुणी’ अशी ओळख असलेल्या तालुका वणी येथे किमान पंधरा वर्षापासून रस्त्यावर वावरणाऱ्या वेडसर महिलेकडे कदाचित लक्ष नसतं. कधी असतं आपण त्यांच्याकडे पाहून तितकस महत्व देत नाही. याला कारण, कुठेतरी माणुसकी संपत चालली आहे. असं म्हणतात पण मात्र, एकीकडे माणुसकी अजूनही कायम आहे. असं एक उदहारण वणी शहरात पहायला मिळाले. आज मनुष्यप्राणी जिवंत माणसाला सोडून हा समाज दगडांमध्ये देव शोधत आहे, अरे खरे देव तुमच्या आसपासच भटकतात, पण कधी ओळखू येत नाहीत. ज्या दिवशी तुम्ही जिवंत माणसांमध्ये देव शोधाल त्यावेळेस चित्र जरा काही वेगळं असेल नाही का!


ही महिला फक्त त्या व्यक्तीला दिसली ज्या व्यक्तीने खरच माणसात देव पाहीला. सोनाली काळे आमच्या फेसबुक मैत्रीण आहेत काही दिवसांअगोदर ताईने व्हाट्सअपला मला या महिलेचा फोटो पाठवला सदर महिलेबद्दल माहिती दिली कामाचा व्याप जास्त असल्याने जाण्यासाठी थोडा उशीर झाला. बरेचदा असं होतं फोटो पाठवणारा फोटो पाठवून देतो नंतर आम्ही तिथे गेल्यावर साधा कॉल सुद्धा उचलत नाही असं होत असतं, पण ताई बद्दल जरा वेगळेच घडले. सकाळी पहाटे ताईला कॉल केला, आम्ही तर वणीला रात्री दीड वाजता पोहोचलो होतो. पण इतक्या रात्री कॉल करून हिला बोलावणे योग्य वाटले नाही. म्हणून आम्ही गाडी मध्येच आराम केला. 

सकाळी कॉल ताईचाच आला नंतर आम्ही त्या महिलेला घेण्यासाठी ज्या ठिकाणी राहायची तिथे गेलो. थोडी तापट स्वभावाची असल्याने सुरुवातीला तिने बोलणे टाळले. लगेच गाडीमध्ये टाकून तिला आतमध्ये घेतले. घाबरलेली महिला तिने गाडी मध्येच संडास करून टाकली, पण अशा वेळेस सुद्धा माझे मित्र तिच्या सोबत बसले हे कौतुकास्पद आहे.

त्यानंतर ताई सोबत बोलणे करून आम्ही गावी परत जाण्यासाठी निघालो असता, ताई बोलली दादा मी एटीएममधून तुम्हाला पैसे काढून देते. असं कळते की, सोनाली ताई एका प्रायव्हेट शाळेमध्ये पाच हजार महिन्याने काम करतात. यावेळी ताईने पाच हजार रुपयाची मदत केली. स्वतःचं लहान मुलगा घरी सोडून काही नातं नसतानासुद्धा त्या महिलेसाठी तू आली व तुझा जीव दुखला, या मानवधर्माला आमचा सलाम. तसेच या कार्यात मला छत्तीसगड येथील जीवनदीप फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र दादा यांनी 1500 रुपयाची मदत केली होती. त्यांना सुरवातीला पेट्रोल टाकण्यासाठी मी स्वतः त्यांना पैसे मागितले होते. असे हितेश दादा बनसोड यांनी सोशल माध्यमातून म्हणाले. 


पुढे हितेश दादा बनसोड या महिलेला माणसात जागृत करण्याकरिता आपल्या संस्थाश्रमात घेऊन गेले कोणताही उदोउदो न करता, टीम खबरकट्टा ने हे वृत्त त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांच्या शब्दात जसेच तसें आपल्या पर्यंत पोहोचविले आहे. उद्देश फक्त एकच आपण समाजभिमुख माणसे आहोत याचे भान ! 

                  
हितेश दादा बनसोड हे रोडवरील अनाथ, निराधार, बेघर, बेवारस, अपंग लोकांसाठी काम करणारी "मन्नत फौंडेशन" ही संस्था चालवितात, मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हाथ देण्याच्या या प्रयत्नाला टीम खबरकट्टा सलाम करते.