" सरणारे वर्ष मी " - मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता...# - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

" सरणारे वर्ष मी " - मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता...#

Share This
खबरकट्टा /विशेष :

मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता...


" सरणारे वर्ष मी "
-----------

मी उद्या असणार नाही 
असेल कोणी दूसरे 
मित्रहो सदैव राहो 
चेहरे तुमचे हासरे 

झाले असेल चांगले 
किंवा काही वाईटही 
मी माझे काम केले 
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु 
तुमची माझी नाळ आहे 
भले होओ , बुरे होओ 
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु 
आणि दोषही देऊ नका 
निरोप माझा घेताना 
गेट पर्यन्त ही येऊ नका 

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली 
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली 

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला 

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही 
मी माझे काम केले 
बाकी दूसरे काही नाही 

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणनार नाही 
" वचन " हे कसे देऊ 
जे मी पाळणार नाही 

मी कोण ? सांगतो 
" शुभ आशीष " देऊ द्या 
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।

येणाऱ्या 2020 नववर्षाच्या टीम खबरकट्टा तर्फे आनंदमयी शुभेच्छा !!!!