महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बळजबरीने अत्याचार : आरोपीस अटक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बळजबरीने अत्याचार : आरोपीस अटक

Share This
महिलांच्या ओळखीतील व्यक्तीच  अत्याचारामागचे  वास्तव  ..!!

खबरकट्टा / यवतमाळ प्रतिनिधी - गणेश पेटकर 

मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील एका व्यक्तीने गवातीलच महिलेवर विश्वासात घेउन बाहेर नेले व बळजबरिने अत्याचार केला. ही घटना दि. 18 डिसेंबर रोजी बुधवारी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घटना घडली. सदर घटनेची माहिती पतीला मिळाली असता, दुसऱ्या दिवशी (आज दिनांक 19 डिसेंबर ) मारेगाव पोलिस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीवर फिर्यादिच्या तक्रारीवरून भांदवी 363-376(1) नुसार गुन्हा नोंदवून आरोपी गणेश धनराज भोयर (वय-25) याला ताब्यात घेतले.


शहरातील ही घटना ताजी असताना, वणी- मारेगाव-यवतमाळ मार्गावर असलेले महाविदयालय, मारेगाव येथेही एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला आहे. किशोर अंबादास पिंगे असे अरोपीचे नाव असून तो तेथीलच कला वाणिज्य महाविदयालयात लॅब असिस्टंट असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पिंगे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून मारेगाव पोलिसांनी भांदवी 354(अ) (5) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.



या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहे. दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना घडत असून महिलांच्या संबधातीलच व्यक्ती अत्याचार करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. आता कोणावर विश्वास  ठेवायचा असा सवाल?