घराला आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घराला आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -

तालुका मुख्यालया पासुन १३ किमी. अंतरावर असलेल्या वायगाव येथील घराला आग लागल्याने घरातील सर्ववस्तु,कपडे जळुन खाक झाले.

हि घटना दि.२१ डिसेंबर च्या रात्री १ वाजताच्या दरम्यान घडली.तालुक्यातील वायगाव येथे नकटुजी यादव मेश्राम हे भुमीहीन व्यक्ती आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दि. २१ डिसेंबरच्या रात्री १ वाजताच्या सुमारास कुटुंबातील सर्व व्यक्ती झोपलेले असतांना अचानक घराला लागली. 


त्यात घराच्या छपरावर गवत टाकला असल्याने आग सुध्दा प्रचंड वेगाने पेट घेतहोती. त्यामुळे घरातील सदस्यांना स्वतःच्या घराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी घरातुन बाहेर पळ काढला. त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने घरातील सर्व सामान, कपडे,दैनंदिन उपयुक्त साहित्य, घराचेपुर्ण फाटे जळून खाक झाले.