खबरकट्टा / चंद्रपूर :
वि.दा.सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस चे नेते मंडळी अवमानजनक उदगार काढत असुन याकरिता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून या करिता विधानभवनापासून ते संपूर्ण देशभर भाजपा कार्यकर्ते निषेध नोंदवित आहेत. आज दिनांक 17 डिसेंबर 2019 ला राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे याचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते श्री.राहुल गांधी ह्यानी स्वातंत्र्यविर वि.दा.सावरकर ह्याचा बद्दल अवमानजनक उदगार वापरल्याने देशवासियांची माफी मागण्या करिता भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी राजुरा याना निवेदन देण्यात आले.वि.दा.सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस चे नेते मंडळी अवमानजनक उदगार काढत असुन याचा तिव्र निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.