महाराष्ट्रभर डॉक्टर रेड्डी बलात्कार प्रकरणाची निवं गरम असतांना बुलढाणा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली. चक्क जनमदात्या बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर दुष्कर्म केल्याची घटना उघडकीस आली आहे.
खबरकट्टा / महाराष्ट्र :
सविस्तर वृत्त असे की, दिनांक २ डिसेंबर रोजी शिवदास सोनोने,मराठी पत्रकार, प्रशांत ढोरे पाटील,दिव्य मराठीचे पत्रकार उद्धव थुट्टे पाटील,नितीन राजपूत,पत्रकार युसूफ भाई ही सर्व मंडळी सायंकाळी ७ च्या सुमारास चिखली येथील मेहंद्रे हॉस्पिटल समोर उभे होते. तितक्यात थुट्टे पाटील यांच्या फोन वर अडव्होकेट दिनेश जपे यांचा फोन आला,ते म्हणाले की, तुमच्या गावाकडील एक १३,१४ वर्षाची मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आमच्या घराजवळ आहे. तिच्या गावाचं नाव व वडिलांचं नाव त्यांनी सांगितलं आणी चौकशी करण्याची विनंती केली.
त्यामुळे तात्काळ या सर्व पत्रकार बांधवानी पिडित मुलीच्या गावचे सरपंच व पोलीस पाटील यांना फोन करून तिच्या वडिलांना निरोप देण्याचे सांगितले.आणी लगेच सर्व जपे वकील यांच्या घरी गेले. तिथे पोलीस स्टेशन चे कर्मचारी ही पोहचले होते, सर्वांनी त्या मुलीची विचारपूस करून तिला पोलीस स्टेशनला आणले.
पत्रकार छोटू कांबळे यांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व सर्व मुलीला घेऊन चिखली येथे असलेल्या तिच्या आत्याच्या घरी सोडायला गेले. परतुं त्या मुलीच्या आत्याने तू पोलीस स्टेशन पर्यंत का गेली म्हणून पिडीत मुलीला सर्वा समक्ष मारहाण केली. व या मुलीला मी घरात घेत नाही असे म्हणत तिला तिच्या वडिलांकडे सोडा व या मुलीं मुळेच माझा भाऊ दारू पितो, माझी भावजय सुद्धा माहेरी निघून गेली आहे, ही मुलगी मोकाट आहे.असं अर्वाच्छ बोलत असतांना त्या मुलीने हंबरडा फोडला व खरं सांगू का? अस म्हणत जोर-जोरात रडायला लागली.
कित्येक वेळापासून गप्प असलेल्या मुलीने आपली आपबिती सांगताच व तीची हृदय पिळवटून टाकणारी घटना ऐकताच सर्वांच्या डोळ्यासमोर जणू अंधारच पडला. त्या मुलीच्या तोंडून पाहिलं वाक्य निघालं माझा जन्मदाता बापच माझ्या जवळ झोपतो,माझ्या सोबत गेले कित्येक दिवसांपासून दुष्कृत्य करतो,माझ्याशी क्रूरकर्म करत असतांनाचा व्हिडीओ बनवून वारंवार धमकी देऊन दुष्कृत्य करत असतो, एकदा माझ्या सावत्र आईने असे करत असतांना प्रत्यक्ष बघितल्या मुळे तिने मला सांगितलं तू या माणसाजवळ राहू नको व तीही माहेरी निघून गेलेली आहे.
मी वेळो वेळी हा प्रकार माझ्या नातेवाईकांना सांगितला तर त्यांनी तुझं लग्न होणार नाही म्हणून ही गोष्ट कोणाला सांगू नको म्हणून मलाच दमदाटी केली व आज मी कंटाळून घर सोडले असल्याचं तिने सांगितलं. इतकंच नाही तर रोजच्या दूष्कर्म सोसत सामाजिक भीती पोटी किमान प्रोटेक्शन तरी वापरा असं ती कोवळ्या वयाची मुलगी आपल्या पोटच्या बापाला विनवणी करत असल्याचे तिने सांगताच सर्वांच्या डोळ्यातून आश्रू आले.
त्या नराधम बापाला जिवंत ठेचून काढावं अशी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अश्या विकृत नराधमाला फासावर चढवावे जेणेकरून अशा पिडितांना खरा न्याय मिळेल.