खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण)
"माँ माणिका युवा क्रिडा मंडळ", चिमूर च्या सौजन्याने भव्य खुले कबड्डी स्पर्धा संपन्न गुरूवार दिनांक.१२ डिसेंम्बर ते १३ डिसेंम्बर २०१९ माँ माणिका देवी मंदिराच्या भव्य प्रांगणात वडाळा (पैकू) चिमूर येथे संपन्न कबड्डी स्पर्धा संपन्न झाले असून आज दिनांक.१५/१२/२०१९ ला बक्षिस वितरण सोहळा पार पाडण्यात आला.
या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक.२१०००/रु.पालोरा ( पवनी ) येथील टिम चा आला तर दुसरा क्रमांक. ११०००/ रु. टेकरी येथील टिमचा आला असून तिसरा क्रमांक.७०००/रु.मासळ येथील टिम ने पटकाविला या संपूर्ण टिम ला आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले असून संपूर्ण चमुंचे माँ माणिका देवी युवा क्रिडा मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी डॉ.रमेशकुमार गजभे माजी राज्यमंत्री , शांतारामजी शेलवटकर उप सभापती पं.स.चिमूर ,प्रकाश वाकडे माजी सभापती पं. स. चिमुर , सचिन फरकाडे शहर अध्यक्ष भाजपा चिमूर , मायाताई नन्नावरे माजी सदस्य पं.स. चिमूर ,सतीश जाधव नगर सेवक चिमूर ,कलीम शेख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर तथा उप सरपंच ग्राम पंचायत तळोधी नाईक , भारती गोडे नगर सेविका चिमूर ,हेमलता नंन्नावरे नगर सेविका चिमूर नगर परिषद व आदींची यावेळी उपस्थिती होती.