मेथीच्या पानात नागअळीचा विडिओ टिक-टॉक वर : गृहिणींना दक्षता घेण्याची गरज ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मेथीच्या पानात नागअळीचा विडिओ टिक-टॉक वर : गृहिणींना दक्षता घेण्याची गरज !

Share This
खबरकट्टा / आरोग्य :

हिवाळा ऋतूत हिरव्या पालेभाज्यांची जास्त प्रमाणात उपलब्धता असते यात प्रामुख्याने मेथी, कोथिंबीर, पालक सर्व घरात आवडीने खाल्ली जाते. परंतु अति कीटनाशकांच्या फवारणीमुळे रसायनयुक्त पालेभाज्यांचे प्रमाण वाढले आहे.
पालेभाज्यांवर येणाऱ्या अनेक किटरोगांपैकी प्रामुख्याने नागमोळी वळणाचे पांढऱ्या रेषा असणारा रोग सामान्यतः असतो. परंतु यावर दुर्लक्ष करू नका व  वर नागमोडी पट्टे आसतिल ती पाने संपूर्ण काढून टाका त्यात नागआळी असते अश्या माहितीचा विडिओ टिक-टॉक वर वायरल झाला असून अनेक गृहिणींना पालेभाज्यांचा वापर करताना बारकाईने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

मेथी विषयी थोडक्यात माहिती :


मेथी(शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecumट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते.

लोणची, रसभाज्यांसाठी वापरण्यात येणारे मसाले तसेच वाटणे यांमध्ये मुख्यतः मेथीदाण्याचा वापर केला जातो. मेथी ही एरिट्रीअन तसेच इथिओपियन जेवणातही वापरली जाते. इथिओपियामध्ये मेथीदाणे हे मधुमेहावरचे औषध म्हणून वापरले जातात. काही यहुदी लोक प्रथा म्हणून रोश हाशनाच्या (यहुदी नववर्ष) पहिल्या आणि दुसऱ्या रात्रीच्या जेवणात मेथीचा समावेश करतात.

मेथीच्या पानांची भाजी केली जाते.ती भाजी खूप पौष्टिक आहे. मेथीच्या पानांचे मुटके केले जातात. मेथीची भाजी उंधियो या गुजराथी पदार्थात वापरली जातात. मेथीची पाने कणकेत मिसळून पराठे, ठेपले असे पदार्थ केले जातात. मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे.