वडेट्टीवार यांनी घेतली कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ : ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्राला पहिल्यांदाच मंत्रिपद : वाचा वडेट्टीवार यांचा राजकीय प्रवास - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वडेट्टीवार यांनी घेतली कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ : ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्राला पहिल्यांदाच मंत्रिपद : वाचा वडेट्टीवार यांचा राजकीय प्रवास

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


राज्यात अतिशय नाटयमयरित्या घडत गेलेल्या राजकीय घडामोडींनतर अल्पकाळाचे फडणवीस सरकार पायउतार झाल्यानंतर अखेर महाराष्ट्रात शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.


महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज दि. ३० डिसेंबर पूर्व विदर्भातील काँग्रेसचे वजनदार नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. वडेट्टीवार यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड होताच चंद्रपूर जिल्ह्यासह त्यांचे मतदार संघ असलेल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. 

मुंबई येथे विधानभवन परिसरात पार पडलेल्या शपथविधी च्या सोहळ्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांचेकडे कोणते खाते येणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे . कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने आता चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. तरीही महिन्याभरापूर्वी वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत संभाषण केल्याचे चर्चेत होते म्हणून  चंद्रपूर की गडचिरोली चे पालकमंत्री म्हणून संभ्रम आहे.

मागील पाच वर्षात पक्ष अडचणीत असतांनाच्या काळात वडेट्टीवार यांनी पक्षासाठी परिश्रम घेतले. त्याचे त्यांना फळ मिळाले असल्याचे मानले जात आहे . चंद्रपूर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूकीसोबतच विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले यात वडेट्टीवार यांची भूमिका महत्वाची राहली आहे. पूर्व विदर्भात विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नव्या सरकारमध्ये काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांची कॅबीनेट मंत्रीपदी वर्णी लागणार, अशी चर्चा आधीपासूनच सुरू होती. 


सन २०१४ च्या निवडणूकीत राज्यात भाजपा - शिवसेना महायुतीचे सरकार आले. त्यावेळी काँग्रेस विरोधी बाकावर असतांना ऐन विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर काँग्रेसचे जेष्ठ नेते विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्याची धुराही विजय वडेट्टीवार यांनी यशस्वीपणे सांभाळली. गेल्या दोन महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांना लागलेल्या उत्सुकतेचा अखेर झाला असून नव्या सरकारमध्ये कॅबीनेट मंत्री म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार व महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली. 

आता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील विजय वडेट्टीवार यांच्याकडे येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. गत पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही काँग्रेस पक्ष अडचणीत असतांना अतिशय संयमीरित्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडीत जिल्ह्यात काँग्रेसला जीवंत ठेवण्यात वडेट्टीवार यांनी परिश्रम घेतले होते. राज्यात काँग्रेसमधीलच बडे नेते भाजपाच्या वाटेवर असतांना गत पाच वर्षापासून जिल्ह्यात कोमात गेलेल्या काँग्रेसला संजवणी मिळवून देण्यात वडेट्टीवार यशस्वी ठरले आहेत. 

यावर्षी सत्तास्थापनेत यश आल्याने आता सत्तेत विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्यातील एक बडा नेता मंत्रीमंडळात राहणार आहे. 

विजय वडेट्टीवार यांची यशस्वी राजकीय कारर्कीद-
 • १९९६ - मध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष 
 • १९९८ ते २००४ - विधान परिषदेचे सदस्य.
 • २००४ ते २००९ - आमदार चिमूर विधानसभा 
 • २००८ ते २००९ - राज्यमंत्री, जलसंपदा, आदिवासी विकास, पर्यावरण वने 
 • २००९ ते २०१४ - आमदार चिमूर विधानसभा 
 • २००९ ते २०१० - राज्यमंत्री , जलसंपदा, उर्जा, वित्त व नियोजन सांसदीय कार्य 
 • २०१४ ते २०१९ - आमदार ब्रम्हपुरी विधानसभ क्षेत्र तथा उपगटनेता काँग्रेस विधीमंडळ 
 • २०१९ ऑक्टोंबर - गटनेता विधीमंडळ काँग्रेस तथा विरोधीपक्ष नेता 
 • २०१९ - ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा आमदार व मंत्री