"चला प्रश्न सोडवुया" व्हाट्स अँप ग्रुप च्या माध्यमातून दुर्धर आजारग्रस्त मन्नत ला आर्थिक मदत - - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"चला प्रश्न सोडवुया" व्हाट्स अँप ग्रुप च्या माध्यमातून दुर्धर आजारग्रस्त मन्नत ला आर्थिक मदत -

Share This
खबरकट्टा / सामाजिक -

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवाराच्या भौतिक गरजांच्या पूर्तीकरिता अहोरात्र श्रम करत असतो. आपला कुटुंब व्यवहार चालवत असतो परंतु कधीकधी आपल्यासमोर अशी परिस्थिती निर्माण होते की , की आपल्याला दुसऱ्याच्या मदतीशिवाय पर्याय राहत नाही. अशावेळी आपण मदतीची याचना करत असतो याची आर्त किंकाळी कुठल्यातरी माध्यमातून कोणाच्यातरी कानावर पडत असते आणि संबंधित व्यक्ती त्या व्यक्तीची परिस्थिती सावरण्यासाठी मदतीला धावून येते व आपल्या परीने त्या व्यक्तीस मदत करीत असतो तदनंतर याचकाच्या चेहऱ्यावर  जो आनंद पहावयास मिळतो तो आनंद म्हणजे माणुसकीचा धर्म होय . सर्व धर्मात श्रेष्ठ अशी माणुसकी आहे आणि माणुसकीची जोपासना करण्यासाठी  आपणही इतरांना मदत करावी.

दुसऱ्यावरचं ओझं कमी करण्यास हातभार लावावा ही भावना निर्माण होत असते ; परंतु मदत कशी करावी , कोणाला करावी  ,केव्हा करावी, कोठे करावी आणि किती करावी असे विविध प्रश्न आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतात ? आणि आपण तो विषय तेथेच सोडून आपल्या कामाला लागतो. आपल्या भावना , आपली मदत आणि आपल्या मनामध्ये समाजाप्रती असणाऱ्या जाणीवेची जोपासना करण्याकरिता एक सामाजिक संघटन निर्माण केलेल आहे ते म्हणजे...MQL फाउंडेशन निर्मित - "चला प्रश्न सोडवूया"

या संघटनांमध्ये सबंध महाराष्ट्रातील  अनेक समाजशील विचारांनी भारावलेल्या  व्यक्ती व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या आहेत.या संस्थेत प्रत्येक सदस्य महिन्याला 100 रुपये नियमित जमा करत आहे, भविष्यात अडचण येउ नये म्हणुन ही संस्था नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संस्थेचा पहिलाच उपक्रम म्हणून चंद्रपुरातील दिलीपकुमार आगलावे यांचा 8 वर्षाचा मुलगा मन्नत याला DMD या गंभीर आजाराने ग्रासले आहे, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आमच्या संघटने मार्फत त्यांना  7001 रुपयेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे सदस्य प्रवीण नवले, प्रकाश होळंबे, सुनिल पोटे, विनोद ढोबे, लेखराज देठे, गणेश लोहे, राहूल ढाकणे प्रामुख्याने उपस्थित होते,