ऐतिहासिक वारसा जपून द्यानात भर पाडणारी प्रदर्शनी : राजुऱ्यात ऐतिहासिक नाणे व डाक तीकिटे प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऐतिहासिक वारसा जपून द्यानात भर पाडणारी प्रदर्शनी : राजुऱ्यात ऐतिहासिक नाणे व डाक तीकिटे प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन.

Share This
-प्रदर्शनीच्या माध्यमातून जागरूकता व प्राचीन वारसा जपला जातो.- आमदार ,सुभाष धोटे

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


           

राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे नाणे प्रदर्शनी समिती, राजुरा द्वारे आयोजित भव्य चार दिवसीय ऐतिहासिक नाणे व डाक तिकीटे प्रदर्शनी - २०१९ चे उद्घाटन राजुरा विधानसभेचे आमदार , सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धोटे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. ते म्हणाले अश्या प्रकारच्या प्रदर्शनीमुळे आपला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपल्या जातो. तसेच जागरूकता निर्माण होऊन नवीन पिढीला आपया अमूल्य  वारसा पुढे चालविण्यास मदत होते.

             
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सिंह ठाकुर, कार्यकारणी सदस्य ,भारतीय मुद्रा परिषद ,वाराणसी, इतिहास तज्ञ तथा नाणे अभ्यासक ,चंद्रपूर यांची उपस्थिति होती.प्रमुख अतिथि म्हणून  अरुण  धोटे नगराध्यक्ष न. प.राजुरा,  सुनील देशपांडे उपाध्यक्ष न. प.राजुरा , अर्शिया जुही, मुख्याधिकारी न.प.राजुरा,  अविनाश जाधव ,सचिव,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,राजुरा आर. एम. सकलेचा,अध्यक्ष,चंद्रपुर मुद्रा परिषद,चंद्रपुर , राधेश्याम अडानिया, मुख्य संयोजक तथा  नगरसेवक, राजुरा , प्रा. बी.यु. बोर्डेवार ,अध्यक्ष राजुरा तालुका पत्रकार संघ, दिपक शर्मा ,अध्यक्ष राजुरा तालुका युवा पत्रकार संघ राजुरा, रमेश घट्टुवार,आनंद सागोडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रुपेश चिडे यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. गुरुदास बल्की यांनी केले.  कार्यक्रमाला प्रदर्शनकार, विद्यार्थी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


श्री अशोक सिंह ठाकुर कार्यकारीनी सदस्य भारतीय मुद्रा परिषद,वाराणसी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमत  प्रासंगिक भाषणात  बोलले कि, इतिहासाची पाने उलघलतांना आपल्या पूर्वजांच्या आर्थिक,सामाजिक ,तथा राजकीय पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली.तसेच नाण्यांचा प्राचीन इतिहास यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले. चंद्रपुर जिल्ह्यातील चांदा मुलक व राजुरा तालुक्यांतील जगदेव नामक नाण्याचे महत्व विशद केले. 

नाण्यांवरुंन तत्कालीन राजा व त्या राज्यातील परिस्थिती याचा अंदाज घेत प्रगती साधता येते.आणि आपल्या पूर्वजांच्या इतीहासावर प्रकाश टाकला जातो असेही प्रतिपादन अशोक सिंह ठाकुर यांनी केले.