- चंद्रपूरच्या अतिप्रदूषित झरपट नदीत भाज्या धुतल्याचा व्हिडिओ झाला वायरल.
- शहरवासीयांच्या पोटात भाजी नव्हे विष जात असल्याची भावना.
- झरपट नदीत शहराची बहुतांश गटारे जातात सोडली
- नदी पट्ट्यातील भाजी वाड्यांतून निघणारी भाजी इथेच जाते धुतली, व्हिडिओ वायरल झाल्याने खळबळ.
खबरकट्टा / चंद्रपूर :वायरल विडिओ -
चंद्रपूर शहरात झरपट नदीच्या गलिच्छ पात्रात ताजा भाजीपाला धुतला जात असल्याचे असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
चंद्रपूर शहरातील सर्व गटारे याच झरपट नदीत सोडली जातात. या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल धुण्यासाठी याच पाण्याचा वापर केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. चंद्रपूरची झरपट नदी व त्यातला नदीपात्राचा भाग म्हणजे अत्यंत गलिच्छ परिसर समजला जातो.
मोकाट कुत्री- डुकरे आणि मानवी आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या सर्व व बाबी या नदीपात्रात आहेत. यातील बहुतांश बाबी व्हिडिओतील पाण्यात स्पष्टपणे दिसत आहेत. याच पाण्यात हा भाजीपाला धुतल्याचे व्हिडीओत दिसत असल्याने चंद्रपूरकर भाज्या नव्हे तर विष खत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतमालकांच्या या कृतीवर कोण आणि कसा अंकुश लावणार असा प्रश्न विचारला जात आहे.
बल्लारपूर शासकीय मुलींच्या वसतीग्रुहात सावळा गोंधळ? मनसेचा समाजकल्याण अधिकाऱ्यांना घेराव !
बल्लारपूर शासकीय मुलींच्या वसतीग्रुहात सावळा गोंधळ? मनसेचा समाजकल्याण अधिकाऱ्यांना घेराव !