अखेर ती अस्वल जेरबंद : वेकोलि वोर्कशॉप, शक्तीनगर वसाहतीनंतर ऊर्जानगर च्या जिल्हापरिषद शाळेच्या आवारातधुमाकूळ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर ती अस्वल जेरबंद : वेकोलि वोर्कशॉप, शक्तीनगर वसाहतीनंतर ऊर्जानगर च्या जिल्हापरिषद शाळेच्या आवारातधुमाकूळ

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपूर शहरातील दुर्गापुर परिसरातील लगतच्या कोळसा खाण परिसरातील वर्कशॉप मध्ये अस्वलीने ठाण मांडले होते त्यानतंर शक्तिनगर या वसाहतीत दोन दिवस आधी या अस्वलीने धुमाकूळ घातला होता.काही दिवसापासून भागात घनदाट वस्तीत अस्वलीच्या वावराने वातवरण भयभीत होते. तर वनविभाग सुद्धा मागील 3दिवसापासून या अस्वलीला पकडण्यासाठी सापळा रचत होते.
            

            

काल दिनांक 4 डिसेंबर 2019 @ऊर्जानगर -कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री आठच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमली. गर्दीने घाबरलेल्या अस्वलीने शाळेच्या मागच्या भागात असलेल्या प्रसाधनगृहाच्या सांदीत आश्रय घेतला. 

वनविभागाच्या चमूने सुमारे तीन तास मेहनत घेत बेशुद्धीचे डार्ट मारून अस्वलीला बेशुद्ध केले. यानंतर ही अस्वल पिंजरा बंद करण्यात आली. तर आता ही अस्वल जेरबंद झाल्यानंतर सततच्या अस्वलीच्या वावराने त्रस्त असलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.