वडसा-शिवराजपूर अत्याचार प्रकरणातील आरोपी राजेश कांबळी ला अटक : अत्याचार केल्यानंतर पीडितेला चाकूने गळा दाबून मारण्याचाही केला होता प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वडसा-शिवराजपूर अत्याचार प्रकरणातील आरोपी राजेश कांबळी ला अटक : अत्याचार केल्यानंतर पीडितेला चाकूने गळा दाबून मारण्याचाही केला होता प्रयत्न

Share This
खबरकट्टा / गडचिरोली : 

सुधारित वृत्तानुसार वडसा-कोंढाळा येथे घडलेल्या लैगिंक अत्याचार प्रकरणात आरोपीने पीडितेला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचे अधिक तपासात पुढे आले असून आरोपी राजेश सुरेश कांबळी (३०) याला देसाईगंज  पोलिसांनी अटक केली आहे. 

पीडित युवती ही देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात शिकाऊ परिचारिका म्हणून कार्यरत आहे. दुपारपाळीतील काम आटोपून ती रात्री साडेसात-आठ वाजताच्या सुमारास बसने आपल्या गावी जात असताना हा प्रकार घडला होता.

आरोपी हा परिचित असल्याने राजेश कांबळी व  रात्र झाल्याने गावी जायला साधन नसल्यामुळे पीडितेने आरोपीच्या मोटार सायकल वर जाण्यास होकार दिला होता.   दरम्यान राजेशने तिला शिवराजपूर फाट्यावरील शेतात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर गळा दाबून तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. यामुळे ती बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाला, असे समजून राजेश तिचा मोबाईल व अन्य सामान घेऊन पसार झालापीडित तरुणी गडचिरोली येथे उपचार घेत असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.  
-----------------------------------------------------------
वडसा ते शिवराजपुर रस्त्यावर तरुणीवर लैंगिक अत्याचार करून आरोपी पसार : पिडीत युवती उपचारादाखल मोजत आहे शेवटच्या घटका 

खबरकट्टा / महाराष्ट्र :गडचिरोली:- 


वडसा – कोंढाळा ते शिवराजपूर रस्त्यालगत राईस मिल जवळ घटना काल 8 डिसेंबर 2019 रात्री  10 ते 10:30 वाजताच्या दरम्यान कोंढाळा येथील तरुणी गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत बसस्टॉप वर उभी होती.गावाकडे जाण्यास कुठलेच साधन न मिळाल्यामुळे ती गाडीच्या प्रतीक्षेत थांबून होती व तीला तिच्या गावचा व्यक्ती दिसल्याने तीने त्याला लिफ्ट मागीतली. अंधाराचा व एकटे पनाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला असल्याची चर्चा कोंढाळा गावात सुरू आहे. आरोपी हा कोंढाळा येथील असल्याची माहिती समोर येते आहे.पिडितेने माझ्यावर बलात्कार झाला आहे,असे सांगत जवळच्या राइस मिल ची मदत घेतली व राईस मिल येथील लोकांनी सदर घटनेची माहिती भ्रमण ध्वनी द्वारे पोलिस स्टेशन वडसा ला दिली.बलत्कार पिडितेणे तक्रार नोंदवली आहे. सदर तरुणी कोंढाळा येथील रहीवासी असुन पीडित युवतीचे वय २० वर्ष आहे. सदर पिडीत तरुणीवर जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू आहे.वडसा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक लांडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असल्याचे त्यांचे मत आहे.मात्र, आरोपी पसार झाले आहेत.