जिल्ह्यात ग्रामपंचायतींची संगणक नादुरुस्ती मुळे पंचाईत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात ग्रामपंचायतींची संगणक नादुरुस्ती मुळे पंचाईत

Share This
 • जिल्ह्यात ग्रामपंचायतींची संगणक नादुरुस्ती मुळे पंचाईत  सेवाकेंद्रातून अनेक दाखले मिळत नसल्याने नागरिकांच्या वाढत्या तक्रारी 
 • कंत्राटदार कंपनीकडून पैश्यांची लूट होत असल्याचा जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरेंचा आरोप 
 • जिल्हा परिषदेने संगणक दुरुस्तींना दाखविली हतबलता 


खबरकट्टा / चंद्रपूर :

ग्रामपंचायत मधून दिले जाणारे दाखले संगणकीय असावेत, यासाठी संगणकीकृत पद्धत अवलंबण्यात आली. याचा कंत्राट मुंबईतील कंपनीला दिला गेला. पण, ही कंपनी ग्राम पंचायतींना लाभदायी नव्हे, तर लाखोंचा भुर्दड देणारी ठरली आहे. या कंपनीने मोबदला अग्रीम स्वरूपात घेतला. पण, संगणक चालकांचे पगार व संगणक दुरुस्तीला ठेंगा दिला. त्यामुळे गावखेड्यातील कामांचा खोळंबा होत  आहे.
विशेष म्हणजे याबाबतीत जिल्हा परिषदेने हात वर केले आहेत.त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाची पंचाईत झाली आहे.जन्म, मृत्यू, कर आकारणी,रहिवासी व अन्य दाखले मागील काही दिवसांपासून संगणकीकृत दिले जात आहेत.


संगणकीकृत दाखले देण्यासाठी मुंबईतील एका कंत्राटदाराची नियुक्ती केली गेली जिल्ह्यासह राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये या कंपनीने संगणक पुरवठा केला. संगणक हाताळण्यासाठी एका संगणकचालकाची नियुक्ती केली असून, यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा स्थानावरएका प्रतिनिधीची निवड करण्यात आली आहे. संगणक चालकाला महिन्याकाठी ६ हजार रुपयांचे वेतन व संगणक साहित्य खरेदी व दुरुस्तीसाठी ६ हजार रुपये देण्याचे फर्मान ग्रामपंचायतींवर सोडण्यात आले. पण,अनेकदा ग्रामपंचायतींच्या तिजोरीत ठणठणाट असतो. त्यामुळे हा पैसा शासनाकडून मिळणाऱ्या १४ व्या वित्त आयोगातून देण्यात यावा, असे निर्देशशासनाने दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतप्रशासन महिन्याचे १२ हजार
रुपयांप्रमाणे वर्षाकाठी १ लाख ४४ हजार रुपये कंपनीला देतो. 

असे असतानाही संगणकात बिघाड आल्यास तब्बल चार ते पाच महिने संगणक दुरुस्त केले जात नाही.त्यामुळे नागरिकांना दाखले देताना ग्राम पंचायती अडचणीत येत आहेत.या कडे साड्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपातळीवर असंतोष पसरला आहे.संगणक चालकांचे नियमित वेतन
देण्यात यावे. संगणक दुरुस्ती करणे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणरा जिल्ह्यातील ग्रामपंचाय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

कंपनीकडून पैशाची लूट : संजय गजपुरेग्रामपंचायती संगणकीकृत करण्याच्या नावावर मुंबईतील कंपनीने पैशाची लूटचालवली आहे.संगणक चालकांचे वेतन तब्बल चार ते सहामहिने थकवले जाते. शिवाय संगणक दुरुस्तीअभावी बरेच दिवस धूळखात पडतात. या कामांसाठी ग्राम पंचायतींनी कंपनीला वर्षाकाठी १ लाख ४४ हजार रुपये आधीच दिले. पण, त्या कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. या कंपनीचा कंत्राटच रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी केली आहे.

संगणक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर : निलेश काळे
जिल्ह्यातील काही ग्राम पंचायतीमधील संगणकात बिघाड आला आहे, हीबाब खरी आहे. परंतु, संगणक दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.संगणक चालकांचे पगार मागील दोन-तीन महिन्यांपासून नियमित होतआहेत, यापूर्वी पगार नियमित होते की नाही, याबाबतचीकल्पना नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांनी दिली.