खबरकट्टा / गडचिरोली :धानोरा तालुका :
कारवाफा- धानोरा तालुक्यातील साखेराटोला येथे कोंबड बाजार भरत असल्याची माहिती मिळताच कारवाफा पोलिस मदत केंद्रातील पोलिस अधिकारी व जवानांनी धाड टाकुन अटक केलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.यामुळे साखेरावासीयांना कोंबड बाजार भोवल्याचे बोलल्या जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये देवाजी लिंगु दर्रो (४६) रा. साखेरा, सोनु नरगु पोटावी (६०), वासुदेव सुकु मडावी (३०), रविंद्र सोमा उसेंडी(२१), रोहीदास पोटावी(२७), बाजीराव गण्णु पोटावी(४५), दिनकर नेवा दुग्गा (२० ), धर्मा मंगा उसेंडी (४५), देवसाय राजु मडावी(३०), सुकरू दुल्लू पदा (४५), जिवन जोगी पोटावी(३९), लक्ष्मण रामसु परसे ( ३३) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साखेरा टोला येथे कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती मिळताच कारवाफा पोलिस मदत केंद्राचे अधिकारी व जवानांनी कोंबड बाजारावर धाड टाकली.
पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असता आरोपींनी व इतरांनी पोलीसांसोबत वाद घालुन त्यांना अटकाव करून धक्काबुक्की केली व बेकायदेशीर जमाव जमवुन शासकिय कामात अडथळा आणला.आरोपींनी पोलिसांना गावात न येण्याबाबत धमकावले व पोलीसांच्या ताब्यातील कोंबडे हिसकावुन घेतले व गुन्ह्यातील पुरावा नष्ट केला. त्यामुळे पोलिसांनी अप.क्र. १३/२०१९, भां.द.वि कलम ३५३,३३२,३४२,२०१,१४३,१४५,१४७,१४९,११७, सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (ब). प्रमाणे गुन्हा दाखल करून सहभागी अटक केली.
आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. गुन्ह्यातील सहभागी आरोपींचा पोलीस कसुन शोध घेत असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अजिनाथ कोठाळे करीत आहेत.