चिमूर सभापतिपदासाठी काँग्रेसकडून : भावना बावनकर, व लता पिसे यांची दावेदारी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर सभापतिपदासाठी काँग्रेसकडून : भावना बावनकर, व लता पिसे यांची दावेदारी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर-प्रतिनिधी (जावेद पठाण )


जिल्ह्यातील १५ पंचायत समित्या मध्ये  सभापती पदाच्या आरक्षनाची सोडत झाल्या नंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाने या निवडणुका १ जानेवारी २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे राजकीय हालचालीना वेग आला असून चिमूर पंचायत समितीचे सभापतीं व उपसभापती निवडले जाणार आहेत या पचायत समितीत१० सदस्य संख्या असून कांग्रेस ७ सदस्य भाजपकडे ३ सदस्य असून या पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसीसाठी राखीव आहे.


कांग्रेसकडे भावना बावनकर व लता पिसे या दोन दावेदार आहेत कांग्रेसकडे बहुमताचा आकडा असल्याने कुणाच्या गळ्यात माळ पडले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

त्यात प्रथम सभापती व नतंर उपसभापती निवडले जाणार आहे पंचायत समितीच्या कार्यालयात सदस्य याच्या विशेष बैठकीत निवडणूका होणार आहेत जिल्ह्यात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकी नंतर सभापती व उपसभापतीची निवड मार्च २०१७ मध्ये झाली होती मात्र विधानसभा निवडणूकी मुळे त्यांना चार महिने मुदतवाढ देण्यात आली. 


पंचायत समितीमध्ये काँग्रेसकडे गीता चौधरी (आंबोली), भावना बावनकर (शंकरपूर), रोशन ढोक (डोमा), शांताराम सेलवटकर (मासळ), गीता कारमेगे(मदनापूर), लता पिसे (नेरी), नर्मदा रामटेके ( शिरपूर ) असे ७ सदस्य तर भाजपकडे पुंडलिक मत्ते (मुरपार), अजहर शेख (खडसंगी), प्रदीप कामडी (भिसी) असे ३ सदस्य आहे.  कांग्रेस कडे बहुमताचा आकडा असल्याने काँग्रेसच्या भावना बावनकर व लता पिसे यांनी दावेदारी केल्यामुळे सभापती पदांची कुणाच्या गळ्यात माळ पडेल, याची चर्चा सुरू आहे.