खबरकट्टा / नागपूर :
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आज महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.
दरम्यान मार्चपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकित कर्ज माफ केले जाणार आहेत.