अगंणवाडी सेविका पात्रता यादीत असतांनाही दिव्यांगाचे कारण देत डावलले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अगंणवाडी सेविका पात्रता यादीत असतांनाही दिव्यांगाचे कारण देत डावलले

Share This
प्रकल्प अधिकार्‍यांनी भेदभाव केल्याचा आरोप :

मला दोन अपत्य असून मी त्यांचा सांभाळ करुन घरातील प्रत्येक काम व्यवस्थितपणे करते विहीरीवरुन पाणी सुध्दा भरते शेतात कापुस वेचणीही करत होती बालपणी मला कमी दृष्टी असल्याने मी आंनदवन येथे दहावीचे शिक्षण घेतले खेळात मला निपुणता होती बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी मला माझेकडील शंभरटक्के अंध प्रमाणपत्रावरुन अक्षम ठरविले आहे हे न्यायोचित नाही ज्या शासन निर्णयाचा आधार घेतला त्यात अपंगला नौकरी देता येत नाही असे नमुद नाही हा माझ्यासोबत भेदभाव आहे अल्का अनिल गेडाम, खैरगाव. 
              
खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना -

कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील अगंणवाडी सेविकेच्या निवड प्रकीयेत अल्का गेडाम पात्रता यादीत पहील्या स्थानावर असतांनाही दिव्यांगाचे कारण देत काम करण्यास अक्षम असल्याचा हवाला देत बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी अगंणवाडी सेविका म्हणून निवड करण्याऐवजी भेदभाव करुन डावलल्याचा आरोप अल्का गेडाम यांनी केला आहे न्यायाकरिता मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद चंद्रपूर यांचेकडे अपील दाखल केली असून अपंगासाठी झटणाऱ्या समाजसेवी संघटनांकडून मदतीचे आव्हान केले आहे.


खैरगाव येथील अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त असल्याने याकरिता अर्ज मागविण्यात आले होते पात्रता यादीत अल्का गेडाम , प्रमिला खुजे , सुवर्णा हुलके व किरण ठाकरे यांच्या नावांचा समावेश होता अल्का अनिल गेडाम हिला जास्त गुण असल्याने पात्रता यादीत तिचे नाव प्रथम क्रमांकावर असल्याने तिची अंगणवाडी सेविका म्हणून निवड जवळपास निश्चित होती याची कल्पना गावातील काही मंडळींना आल्याने त्यांनी पाण्याची टाकी व नवीन रस्त्या मागणीच्या नावाखाली गावकऱ्यांच्या सह्या घेत त्याचा वापर दिव्यांग व्यक्ती अंगणवाडी केन्द्र सांभाळू शकत नाही या तक्रारीकरिता करत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. 

याच तक्रारीचा आधार घेत दिनांक २८/११/२०१९ रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी कोरपणा यांनी अल्का गेडाम ह्या शासन निर्णय एबावि-२०१२/प्र.क्र./४२९/का-६ दिनांक १३आॅगस्ट २०१४ अन्वये अंगणवाडी केंद्र सांभाळण्यास सक्षम नसल्याचा ठपका ठेवून भेदभाव करत निवड करण्यापासून डावलले आहे एकीकडे शासन अपंग व्यक्तींना जीवन जगण्याकरीता नोकरीमध्ये विशेष आरक्षण देऊन नौकरीत सामावून घेते तर दुसरीकडे अधिकारी दिव्यांगांसोबत भेदभाव करतात अल्का गेडाम हिचेवर अन्याय करुन भेदभाव केला असल्याने तिने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद चंद्रपूर यांचेकडे अपील दाखल करुन न्याय मागतिला असुन जिल्हातील अपंगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समाजसेवी संस्थांना पुढे येऊन मदत करण्याचे आव्हान केले आहे 
       पात्रता यादी नाव होते परंतु गावकर्‍याची तक्रार असल्याने शासन निर्णयानुसार कारवाही केली आहे भेदभाव झाला असेल तर निर्णया विरोधात त्या अपील करु शकतात -गणेश जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी कोरपना