जिवतीची प्रगती झाली एका फोन वर दारू आली,प्रशासना कडून सर्रास दुर्लक्ष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवतीची प्रगती झाली एका फोन वर दारू आली,प्रशासना कडून सर्रास दुर्लक्ष

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती : संतोष इंद्राळे



चंद्रपूर जिल्याची दारू बंदी होऊन चार वर्षे झाली पण जिवती शहरात ठिकठिकाणी " एका फोन वर दारू आली असे चित्र आहे " शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री केली जात आहे,जिवतीला तेलंगणा राज्याची सिमा लागून असल्यामुळे तिकडून शहरात दारू येत असेल अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

तरी मात्र प्रशासना कडून डोळ्यावर हात ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे अवैध रित्या दारू विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र परिसरात आहे.प्रशासन मात्र गावाबाहेर होणाऱ्या दारू तस्करीवर थातुरमातुर कारवाई करून आपण केलेली कारवाई योग्य असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्याना भासवून येथील अट्टल दारू विक्रेत्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.


मद्यपी आपली हौस भागवण्यासाठी ठरवून दिलेल्या किंमती पेक्षा दुप्पट पैसे देऊन दारू विकत घेत आहेत.अश्यातच दारू विक्रेता दुप्पट नफा कमावित असल्याने नीट उभा होत असलेला सुखी संसाराचा डोलारा पुन्हा कोसळायला सुरुवात होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून शहरात चलते - फिरते लायसन्स असलेले बार कधी बंद होणार आहे,व अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.