थरारक : रेल्वे रुळावर कोसळलेल्या युवकाच्या अंगावरून गेली मालगाडी : नशीब बत्तलवार म्हणून वाचला जीव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थरारक : रेल्वे रुळावर कोसळलेल्या युवकाच्या अंगावरून गेली मालगाडी : नशीब बत्तलवार म्हणून वाचला जीव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 



आज 10 डिसेंबर 2019 ला  दुपारी 12 :30वाजता वडसा रेल्वे स्टेशन वरील मुख्य रेल्वे ट्रॅक वर  गोंदिया बल्लारपूर प्यासेंजर आली असता, गाडीत चढण्याकरिता काही युवकांनी धाव घेतली. वर्दळीमुळे एक युवक दुय्यम रेल्वे रुळावर कोसळला. 

त्याच्याकडे सामानाचे ओझे असल्यामुळे लगबगीत त्याला उठता आले नाही काही वेळ रुळावरच पडून होता अचानक तितक्यात त्याच रुळावर दुसरी गाडी येत असल्याचा सायरन वाजल्याने गोंधळ युवक  तिथेच पडून राहिला व गाडी त्याच्या वरून जाण्यास सुरुवात झाली. 



ही घटना बघून स्टेशन वरील सर्व प्रवाश्यांची बघ्याची गर्दी केली व अनेकांचा जीव मुठीत होता परंतु, मालगाडी वरून गेल्यावरही प्राण वाचले तरी युवक संपूर्ण हादरलेल्या स्थितीतून रूळ वरून बाजूला होताच सर्वांनी जीव वाचल्याचा श्वास सोडला. नशीब बत्तलवार म्हणून जीव वाचल्याची चर्चा वडसा स्टेशन वर होती. ही संपूर्ण घटना एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.