चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव येथील झुणका भाकर बनविणाऱ्या दुर्गा शेती महिला बचत गटांनी आज गांवात भागवत सप्ताह असल्यामुळे स्वच्छता करून केंद्रा जवळील संपूर्ण परिसर स्वच्छ केला गेला.गावात भागवत सप्ताह चा आयोजन केले आहे.याचा विचार न करीता ग्राम पंचायत नि स्वछता न करीता त्याना स्वचतेचा विसर पडला का,की काय?
क्लिक करा : " माणुसकीची भिंत " चंद्रपूर मनपाचा विधायकी उपक्रम
हेही वाचा : भाजप आणि मुनगंटिवार सत्तेवरून गेले; इकडे चंद्रपुरात मद्यशौकिनांच्या आशा पल्लवित - वाचा : राज्यातील सत्ताबदलाचा असाही परिणाम
क्लिक करा : " माणुसकीची भिंत " चंद्रपूर मनपाचा विधायकी उपक्रम
हेही वाचा : भाजप आणि मुनगंटिवार सत्तेवरून गेले; इकडे चंद्रपुरात मद्यशौकिनांच्या आशा पल्लवित - वाचा : राज्यातील सत्ताबदलाचा असाही परिणाम
देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. पण पळसगांव यास अपवाद ठरत आहे़.
ग्रा़मपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावात स्वच्छतेचा बोजबारा वाजला आहे़. ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचा विसरच पडल्याचे गावातील एकूण चित्रावरून दिसते़ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़. याकडे लक्ष देत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होनार आहे़.
गावात ऐन रस्त्यावर शेणाचे उकिरडे साचले आहे़. गावाचा दर्शनी भाग हागणदारीयुक्त असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे़.मात्र गावातील मुख्य मार्गावर गांव हागणदारी मुक्त असा बोर्ड लावला असून या बोर्डवर मात्र हागणदारी मुक्त चा दिनांक मात्र टाकला नाही ही एक बाब लोकांच्या निदर्शनास आले आहे. असल्या अस्वच्छतेचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे़.संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी अस्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे़.
पण येथे येताना गावाच्या दर्शनी भागात नाकावर हात वा रूमाल ठेवून प्रवेश करावा लागतो, ही या गोदरीयुक्त गावाची शोकांतिका आहे़. पण आता याच रस्त्यावर ऐन रहदारीच्या ठिकाणी वस्तीमध्ये अनेकांनी शेणाचे उकिरडे तयार केले आहेत़. उभारले आहेत़ यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाली आहे़ या प्रकारामुळे शाळेचा परिसरही घाणीच्या साम्राज्यात हरवला आहे़.ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने काही नागरिकांचा मनमानी कारभार सुरू आहे़ दिवसेंदिवस रस्त्यावर घाण वाढत आहे़. सोबतच घराचे ओटे समोर करून अतिक्रमणही करण्यात आले आहे़. यामुळे हे गाव आहे की गोठाण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़.
गत अनेक वर्षांपासून या गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले नाही़ गावातील विविध समित्या केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात येत असल्याचे दिसते़ देशात सर्वत्र स्वच्छेतेची शपथ घेऊन अभियान राबविले जात आहे. पण येथील ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडल्याचेच दिसून येत आहे़. गावातील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़. चिमुकल्यांसह वृद्धांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे़ गावातील घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे़.
गावातील झुणका भाकर बनविणाऱ्या दुर्गा शेती महिला बचत गटांनि मात्र आज आपल्या बस्सथनाक जवळील चा रस्ता स्वच्छ करून रामधून जाण्यासाठी रस्ता स्वच्छ केला आहे,या कामी आश्रम शाळे मधील विद्यार्थी वर्ग,कर्मचारी,बसस्थानक जवळील हात टपरीवर काम करणारे,तुकाराम शिवरकर,धनपाल मसराम बचत गट महिला,भामीना सोनेकर,वंदना दडमल,उषा सोनेकर,संगीता दडमल व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.