खबरकट्टा / चंद्रपूर:-
चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन येथील कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला विनयभंग केला असल्याची पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेंद्राबाद येथील रेड्डी प्रकरण ताजे असतानाच,
अत्यन्त सुरक्षित आणि प्रचंड सिआयएसएफ बंदोबस्त असलेल्या चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन (CSTPS)येथे काल दिनांक 6 डिसेंबर सकाळच्या सुमारास WTP-3 संच क्रमांक 8 आणि 9 येथे कार्यरत सिनीयर लॅब टेक्निशियन राजू पवार यांनी जुनियर लॅब टेक्निशियन चा ऑफिस मध्ये कुणीही नसल्याचा फायदा घेत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
पवार यांनी या आधी देखील प्रकार केल्याचे कर्मचाऱ्यानचे म्हणणे होते.त्याची काल या महिला कर्मचाऱ्याने कार्यालयीन तक्रार केली असता आज दिनांक 7 डिसेंबर ला दुपारी दुर्गापुर पोलीस ठाण्यात तक्रार झाली असून पुढील तपास दुर्गापुर पोलीस करीत आहे.