शाळेची एकही पायरी न चढणारे
संत गाडगेबाबा होते निरक्षर
पण आपल्या समाजप्रबोधनातून
लोकांना करित होते साक्षर...!
स्वच्छता आणि प्रबोधनातून
जागरूक करायचे समाजाला
त्यांच्या कार्याची दखल घेऊन
नाव दिले अमरावती विद्यापीठाला...!
रस्त्यावरची घाण स्वच्छ करत
समाजाचे डोके हि स्वच्छ केले
पण स्वच्छता अभियानात आता
गाडगेबाबांचे नाव गायब झाले...!
गाडगेबाबाच्या कार्याला लोकहो
विसरून आता चालणार नाही
स्वच्छ भारत अभियानाचे कार्य
गाडगेबाबा शिवाय होणार नाही...!
दिवसभर गावाची स्वच्छता
आणि रात्री करायचे प्रबोधन
अश्या महान कर्मयोगीस
माझे विनम्र अभिवादन...!!
✒️सुरज पी. दहागावकर, चंद्रपूर, संपर्क:-८६९८६१५८४८