दोन दिवसापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला वर्धा नदीत ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दोन दिवसापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला वर्धा नदीत !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
             
राजुरा शहरातील आमराई वॉर्ड येथील रहिवासी सुनील बाबुराव भोयर (46)हे दिनांक 12/12/2019, दुपारी 2वाजता पासून आपल्या राहत्या घरूनच सुझुकी दुचाकी क्रमांकम्हणून एमएच  34 जे 9472 या गाडीने घरून गेले असता घरी परतले नसल्यामुळे, एक दिवसाचा कालावधी लोटल्यावर काल 13डिसेंबर ला कुंटुंबीयानी अनेक शोधाशोध केल्यानंतर राजुरा पोलीस ठाणे येथे बेपत्ता तक्रार नोंदविली होती. 


आज दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास राजुरा बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदी पुलाजवळ अचानक एक मृत शरीर पाण्यावर तरंगत असताना काही लोकांना आढळल्यावर, तात्काळ राजुरा पोलिसांनी मृत शरीर पाण्याबाहेर काढून तपास केला असता, बेपत्ता सुनील बाबुराव भोयर यांच्या वर्णनाशी साम्य आढळल्याने त्यांच्या कुटुंबियांना सूचना दिली. कुटुंबीयांनी ओळख पठविल्यानंतर शविच्छेदन करून मृत शरीर ताब्यात देण्यात आला असून गाडीचा शोध राजुरा पोलीस घेत आहेत.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून सुनील भोयर यांचा मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरु होता परंतु काही महिन्यांपासून प्रकृती उत्तम होती,म्हणून कुटुंबीय निश्चिन्त होते अचानक  ही आत्महत्या झाल्याचे कळले.