खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर-प्रतिनिधी (जावेद पठाण )
चिमूतालुक्यातील भिसी गावात मागील काही महिन्यांपासून भिसी परिसरातील जंगलव्याप्त सावर्ला- डोंगर्ला , जामगाव, महालगांव ,गरडापार , चिखली ,कन्हाळगांव , कळमगांव , नवेगाव या ग्रामीण परिसरात पट्टेदार वाघाची दहशत आहे.
शेतातील कापसाच्या पिकात आणि गावात वाघाने बस्तान मांडल्याने गावकरी, शेतकरी - शेतमजुरात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे . शेतकरी शेतातील पिकांचे रात्रपाळीत रक्षण करण्यासाठी जागरण करीत असतात .आणि दिवसा शेतमजूर शेतातील कापूस आनी इतर कामे करीत असतात. अशावेळी शेतातील उभ्या पिकात रानटी डुकरे आणि वाघ राहत असल्यामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यावर हमला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवसाढवळ्या शेतातील उभ्या कापसाच्या पिकात रानटी डूकरावर वाघ हमला करून त्याची शिकार करीत असतो, त्यांचा वावर त्याच परिसरातील शेतात असल्याने गावपरीसरातील शेतकरी त्या परीसरात रात्रपाळी ( जागल ) आणि काम करण्यासाठी जात नसतात . शेतातील कामे कशी करावी असा प्रश्न शेतकरी -शेतमजुरांना पडलेला आहे.पट्टेदार वाघाच्या दहशतीने शेतकऱ्यांची शेतातील कामे खोळंबलेली आहे . कापुस वेचणी , धाणाची मळणी , व्हायची आहे, चना , तूर ,लाखोळी , जवस ,गहू , हळद , आनी पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलेला आहे . असीच वाघाची दहशत राहिली तर शेतकऱ्यांना रब्बी पिकापासून वंचित राहावे लागेल.
जिव मुठीत व मनात वाघाची धास्ती ठेवून शेतात शेतकरी -शेतमजूर जात आहे. पट्टेदार वाघाच्या संचार हा जंगलाऐवजी शेतातील पिकात जास्त वाढलेला आहे. एक ते दोन दिवसाआड शेतकर्यांचा शेतातच सावजाची शिकार करून त्याचा फडशा पाडत आहे. त्यामुळे तो वाघ त्याच परिसरात बऱ्याच महीण्यापासुन बस्तान मांडून आहे .वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलव्याप्त परिसरातील शेतात आपली सुरक्षा वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.