खबरकट्टा / चंद्रपूर : जाहीर सूचना -
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ३७ (१) (३) कलम लागू करण्यात आले आहे. जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर यांनी हे कलम लागू केले आहे.
हे कलम २६ डिसेंबर २०१९ च्या मध्यरात्रीपासून तर ९ जानेवारी २०२० ला रात्रो १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, मिरवणूक काढणे, पाच पेक्षा अधिक लोक जमा असणे, लाऊडस्पिकर वापरणे, जिवीतास धोका होईल असे शस्त्र, दंडूके, बंदूक, शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल. अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे आढळून आल्यास संबंधीतावर कारवाई केली जाणार आहे.