खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 16 डिसेंबर -
स्थानीक साने गुरुजी सभागृहात नुकतीच लोहार समाजाची सभा संपन्न झाली. सभेला प्रमुख अतिथि म्हणून चंद्रपुर जिल्हाध्यक्ष डॉ.कामाटकर ,जिल्हा महासचिव विजय पोहणकर ,माजी जिल्हाध्यक्ष भास्कर कामटकर ,गडचांदुर पराले, चंद्रपुर ,हरीदास चंदनखेडे ,बल्लारपूर ,विलास शेंडे ,जीवती ,विठ्ठल बावणे ,तानाजी बावणे ,राजोली ,अरुण चिंचोलकर ,विसापूर ,भाउजी चंदनखेडे ,राजुरा व जिल्हा सल्लागार सुधाकर चंदनखेडे ,धनराज दूर्वे ,रमेश हजारे ,चंद्रपुर ,जिल्हा उपाध्यक्ष मोहनदास मेश्राम,राजुरा यांची प्रमुख उपस्थिति होती.
सदर सभेत समाजाचा वार्षिक अहवाल सादर करून समाजातील विविध विषयांवर व समश्यांवर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते राजूरा तालुका अध्यक्षपदी बंडु बावणे तर महासचिवपदी संतोष चंदनखेडे यांची नियुक्ति करण्यात आली.सभेला रवींद्र ठमके ,संजय सूर्तेकर ,मनोज झुंगरे ,सुभाष बावणे ,राजू बावणे ,आल्लविन सावरकर ,अनिल चव्हाण ,शिवनकर ,विनोद ठमके ,सुभाष हजारे ,गणेश चंदनखेडे ,राजू हजारे आदींसह राजुरा तालुक्यांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.