थेट तहसीलदाराच्या समोरच शेतकऱ्याने केले विष प्राशन : “काय साहेब तुम्ही माझे कुटुंब संपविण्यासाठी याठिकाणी बसले आहात का? ” म्हणत आत्महत्येचा प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थेट तहसीलदाराच्या समोरच शेतकऱ्याने केले विष प्राशन : “काय साहेब तुम्ही माझे कुटुंब संपविण्यासाठी याठिकाणी बसले आहात का? ” म्हणत आत्महत्येचा प्रयत्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

जिवती तहसीलदार कार्यालयाच्या दालनात तहसीलदारासमोर एका शेतकऱ्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 1:30वाजताच्या सुमारास घडली आहे.कीसन दादाराव  सानप असे शेतकऱ्याचे नाव असून यांचा जमीनीचा वाद सुरु आहे.


परंतु तहसीलदार हे एकतर्फी भुमीका घेऊन सातत्याने अनेकदा वेढीस धरले त्यांना तारखेवर बोलवून धाकदपट करून त्यांना चुकीच्या पद्धतीने दंडात्मक कारवाई करणे व कार्यालय सुटेपर्यंत बसून ठेवणे,जमानतीसाठी पैशांची मागणी करने तसेच वेळोवेळी धमकावण्याच्या प्रकारामुळे शेवटी तहसीलदारचा जाचामुळे कंटाळून टोकाची भूमिका घेत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे होते. 

तर आता आपली जीवनयात्रा संपवण्यासाठी थेट तहसीलदार बेडसे यांच्या कार्यालयात घुसून “काय साहेब तुम्ही माझे  कुटुंब संपविण्यासाठी याठिकाणी बसले आहात का” असे म्हणत विषप्राशन करत आता साहेब माझा अंतिमसंस्कार तुम्हीच करा असे म्हणत जागीच कोसळले.त्यानंतर लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे दखल करण्यात आले असून शेतकऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.या घटनेमुळे परिसरातील वातावरण तापले असून सर्व क्षेत्रांतून सदर घटनाचा निषेध आणि तहसीलदारावर कारवाईची मागणी होत आहे.