प्रा.योगेश येणारकर सर यांची अभाविपच्या विदर्भ प्रांताध्यक्ष म्हणून निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रा.योगेश येणारकर सर यांची अभाविपच्या विदर्भ प्रांताध्यक्ष म्हणून निवड

Share This
-चंद्रपूर जिल्ह्यातील  कार्यकर्त्यांची विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड

खबरकट्टा / चंद्रपूर : 
         
विश्वातील सगळ्यांत मोठे विद्यार्थी संघटन असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच नुकतेच 48 वे विदर्भ प्रांत अधिवेशन भंडारा येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यामध्ये विदर्भ प्रांत अध्यक्ष म्हणून चंद्रपूर मधील प्रा.योगेश येणारकर सर यांची निवड करण्यात आली. प्रा. योगेश येणारकर सर हे स्थानिक राजीवगांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

हेही वाचा : " माणुसकीची भिंत " चंद्रपूर मनपाचा विधायकी उपक्रम !

क्लिक करा : दारूबंदीच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारु महागली !


तसेच  1987 पासून अभाविप च्या संपर्कात आणि प्रांत उपाध्यक्ष, चंद्रपूर नगर अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रविण गिलबिले, दामोदरजी द्विवेदी, शुभम निंबाळकर, शकील शेख, रोशनी नगपुरे, सचिन केंद्रे यांची निवड करण्यात आली. यांचे शैक्षणिक क्षेत्र आणि सर्वस्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.