रेती तस्करांनी दगडाने ठेचून केली युवकाची हत्या : तीन आरोपी फरार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रेती तस्करांनी दगडाने ठेचून केली युवकाची हत्या : तीन आरोपी फरार

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : नागपूर -खापरखेडा -रेती तस्करीच्या जुन्या वादात माउझरने गोळी झाडून जख्मी केल्या प्रकरणी मध्यवर्ती कारागृहातून शिक्षा भोगून आलेल्या तरुणाची  दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना खापरखेडा येथून जवळ असणा-या वारेगाव सुरदेवी टी पॉइंटवर आज सकाळी 9ः30 च्या  सुमारास घडली. मंगेश बागडे वय (25) रा. साहोली असे मृतकाचे नाव तर राजेश पेंदाने (33)   सचिन चव्हाण (32) दोन्ही रा. भानेगाव असे फरार झालेल्या दोन आरोपीचे नांव आहेत.


मिळालेल्या माहिती नुसार मृतक मंगेश बागडे तसेच आरोपी राजेश पेंदाणे, व सचिण चव्हाण हे खापरखेडा परिसरात रेती तस्करी करायचे. मागील एक दीड वर्षांपूर्वी आरोपी पेंदाणे यास   माऊजरने गोळी झाडून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात मंगेश बागडे याला शिक्षा झाली होती.


नुकताच शिक्षा भोगून घरी आलेल्या मृतक मंगेश आज सकाळी घरुन भानेगाव - पारशिवनी टि-पाईंट कडे पल्सर मोटरसायकल क्रमांक MH 40 AD 6979 ने गेला होता यावेळी तो अचानक वारेगावाकडे फिरायला गेला असताना त्याच्या मागावर असलेले आरोपी यांनी आपल्या बोलोरो MH40 KR1489 ने मृतकाच्या गाडीला कट मारून मृतक मंगेश यास गाडीवरून पाडले. 

घटने दरम्यान मृतकाच्या पाठलाग करताना आरोपीची बोलेरो चे संतुलन बिघडल्यामुळे एका खड्ड्यात जाऊन आदळली. दरम्यान आरोपी बोलेरो गाडीतून उतरून मंगेश च्या मागे धावत जाउन त्याला दगडाने ठेचून रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या झटापटीत दोन्ही आरोपींचे माउझर हातातून पडले व त्यांनी तेथून पळ काढला.

यावेळी मार्गांनी येणा-या जाणा-यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. एका इंडिका कारने मंगेशला कामठी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविले. परंतु  डॉक्टरांनी मंगेशला तपासले असता त्यास मृत घोषित केले.