ऐतिहासिक नाणे व डाक तिकिटाचे भव्य चार दिवसीय प्रदर्शन राजुरात अवतरणार अमूल्य संस्कृतिचा वारसा : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऐतिहासिक नाणे व डाक तिकिटाचे भव्य चार दिवसीय प्रदर्शन राजुरात अवतरणार अमूल्य संस्कृतिचा वारसा :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


                
चंद्रपुर मुद्रा परिषद ,चंद्रपुर तथा ऐतिहासिक नाणे व डाक तिकीटे प्रदर्शनी समिती राजुरा द्वारा चार दिवसांची भव्य प्रदर्शनी राजुरा येथील छ.शिवाजी महाराज संकुल,सुपर मार्केट हॉल,आसिफाबाद रोड येथे दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

यात आपल्या देशी  व विदेशी दुर्मिळ मुद्रा व प्राचीन काळातील चलन ,नोटा ,वस्तु तसेच डाक तिकिटे बघून त्यांची माहिती घेता येणार आहे. ही प्रदर्शनी सर्वांना मोफत बघता येणार आहे.
प्राचीन मुद्रा संस्कृतिचे दर्शन घडविणे व त्यांचे जतन व संग्रह करण्याची प्रव्रूति वाढविण्यास या प्रदर्शनीचा उपयोग होईल.या प्रदर्शनीत स्थानिक संग्रहकर्ताना सहभागी होण्याची संधी आहे.या प्रदर्शनीत जन्मतारीख ,विवाह तारीख ,लग्न वर्षगाठ, तसेच आपल्या अविस्मरणीय क्षणांच्या तारखेच्या नोटा खरेदी करता येतील तसेच जुन्या नाण्याची खरेदी -विक्री करता येणार आहे. चार दिवसीय प्रदर्शनीचे उद्घाटन सुभाष धोटे,आमदार ,राजुरा  यांच्या हस्ते व अँड.संजय धोटे,माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 

विशेष अतिथि म्हणून माजी आमदार अँड.वामनराव चटप, प्रमुख अतिथि म्हणून अरुण धोटे,नगराध्यक्ष, न.प.राजुरा , सुनील देशपांडे ,उपाध्यक्ष ,न.प.राजुरा, कुंदा जेणेकर,सभापती,पं.स.,राजुरा , अर्शिया जूही,मुख्याधिकारी,न.प.राजुरा , अशोकसिंह ठाकुर, कार्यकारणी सदस्य ,भारतीय मुद्रा परिषद,वाराणसी ,अविनाश जाधव ,सचिव,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,राजुरा, सीधार्थ पथाडे, उपाध्यक्ष,म.रा.स.संघ,पुणे तथा जिल्हाध्यक्ष, आरपीआय( ए.), आर.एम.सकलेचा,अध्यक्ष ,चंद्रपुर मुद्रा परिषद,चंद्रपुर, सतीश धोटे, अध्यक्ष, बा.शी.प्र.मं.राजुरा, नितीन पीपरे,वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख,शिवसेना, प्रा. बी.यू. बोर्डेवार,अध्यक्ष,राजुरा तालुका पत्रकार संघ, एजाज अहमद, अध्यक्ष ,राजुरा पत्रकार असोसिएशन, दीपक शर्मा,अध्यक्ष, राजुरा तालुका युवा पत्रकार संघ यांची उपस्थिति राहणार आहे.


या चार दिवस चालणाऱ्या नाणे व डाक तिकीटे प्रदर्शनीचा सर्व नागरिक ,विध्यार्थीनी मोठ्यासंख्येने लाभ घेण्याचे आवाहन मुख्यसंयोजक, राधेश्याम अडानिया, संयोजक,बादल बेले,रमेश घट्टुवार ,हरबा पेंदाम ,आनंद सागोले,पारस सागोले, सहसंयोजक सागर भट्पल्लिवार,प्रा.गुरुदास बल्कि ,रुपेश चीडे,बंडु बोढे,हेमंत बजाज , गणेश रेकलवार ,करण डोडलावार ,मनोज तेलीवार यांनी केले आहे.