शिक्षकनियुक्ती साठी गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिक्षकनियुक्ती साठी गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे जिवती तालुक्यातील सेवादासनगर येथील जि.प.शाळेतील शिक्षकाचे पद मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहे,सदर पद भरण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आली होती.मात्र याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.


त्यामुळे पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने ७ डिसेंबर ला शिक्षक मागणी संदर्भात मा.संवर्ग विकास अधिकारी,जिवती यांना मागणीचे निवेदन दिले होते.त्यात ११ डिसेंबर पर्यंत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकू असा इशारा दिला असताना सुद्धा  आज घडीला शिक्षक दिला नाही.
सेवादानगर येथे एक ते सात वर्ग असलेली प्राथमिक शाळा आहे,दोन वर्षा पूर्वी शाळेत पुरेसचे शिक्षक होते मात्र शिक्षकांच्या बदल्या इतरत्र झाल्या मात्र त्यांची रिक्त जागा शिक्षण विभागाकडून भरण्यात आले नाही.एक ते सात वर्ग असताना किमान पाच शिक्षक असणे गरजेचे आहे.मात्र सध्या शाळेत तीन शिक्षक व सात वर्ग अशी परिस्थिती आहे त्यामुळे विध्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
म्हणून आज गावातील नागरिकांनी व शालेय व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने आज शाळेला कुलूप ठोकले आहे जो पर्यंत शाळेला शिक्षक मिळणार नाही तो पर्यंत शाळा उघडणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

सेवादासनगर येथील शालेय व्यवस्थापन समितीचे निवेदन मिळाले असून याच शाळेतील प्रतिनियुक्तीवर दिलेल्या शिक्षिकेला पूर्ववत रुजू होण्यासंदर्भात आदेश काढला आहे,एक ते दोन दिवसात शाळेत शिक्षक रुजू होणार -मा.सुरेश बागडे , संवर्ग विकास अधिकारी जिवती