-जनसामान्य माणसातून होत आहे चौकशी करण्याची मागणी
चिमूर- प्रतिनिधी ( जावेद पठाण )
चिमूर:- शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर नियंत्रण ठेवण्यासाठी २००५ साली शासनाने कायद्यात बदल करून ज्या कर्मचाऱ्याला २००५ नंतर तिसरे अपत्य असलेल्यास त्याला नोकरी करता येणार नाही असा निर्णय काढला असून, याची कसून चौकशी चिमूर पंचायत समितीमध्ये करावी अशी मागणी जनता करीत असून,तात्काळ या मागणीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे व प्रत्येक कर्मचाऱ्यांची चौकशी करावी.
सामान्य माणसाला कोणत्याही प्रकरणाची माहिती घेता यावी म्हणून शासनाने माहिती अधिकार हा निर्णय काढला असून, या माहिती अधिकारात पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अपत्य बाबत माहिती मागल्यास उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे माहिती अधिकाराचे सुद्धा उल्लंणघन होत आहे. तरी सुद्धा अधीकारी जाग्यावर आपल्याच..! आणि जनता बाजूला ?? ही परिस्थिती चिमूर पंचायत समिती मध्ये होताना नागरिकांना दिसत आहे. त्यामध्ये या अधिकाऱ्यांची तीन अपत्ये बाबत त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाही करावी,व ज्या अधिकाऱ्याला तीन अपत्य आढळल्यास त्याला निलंबित करण्याची मागणी जनता करीत आहेत.